दाेन दुकानांची अनामत रक्कम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:47+5:302021-04-02T04:09:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : मागील वर्षी काेराेनाच्या संक्रमणकाळात खापरखेडा (ता. सावनेर) व तामसवाडी (ता. पारशिवणी) येथील परवानाधारक स्वस्त ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : मागील वर्षी काेराेनाच्या संक्रमणकाळात खापरखेडा (ता. सावनेर) व तामसवाडी (ता. पारशिवणी) येथील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानांतील धान्यचाेरी प्रकरण चव्हाट्यावर आले हाेते. चाैकशीअंती जिल्हा प्रशासनाने या दाेन्ही दुकानदारांना जबाबदार धरत त्यांची अनामत रक्कम जप्त केली. शिवाय, अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा प्राप्त झाल्यास परवाना रद्द करण्याची ताकीदही दिली.
खापरखेडा येथे सुरेश रामटेके, तर तामसवाडी येथे उमा गुजरमाळे यांचे परवानाधारक स्वस्त धान्य दुकान आहे. या दाेन्ही दुकानांमध्ये काेराेनाच्या काळात नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या धान्यात घाेळ केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. माहिती अधिकार कार्यकर्ता शेखर काेलते यांनी या दाेन्ही दुकानांना भेटी देत पाहणी केली आणि त्यांची तालुका व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तसेच अन्न व पुरवठा मंत्रालयाकडे तक्रारी केल्या हाेत्या.
दरम्यान, शासनाच्या आदेशान्वये दाेन्ही तालुक्यांतील पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी या प्रकरणांची चाैकशी करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर केला. यात सुरेश रामटेके, खापरखेडा व उमा गुजरमाळे, तामसवाडी यांना द महाराष्ट्र शेड्युल कमॉडिटीज (रेग्युलेशन ऑफ डिस्ट्रिब्यूशन) रेग्युलेशन १९७५ च्या कलम १८ (२) नुसार दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या दाेन्ही दुकानदारांची कलम ३ (२) चा आधार घेत संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली. शिवाय, असा प्रकार यापुढे घडल्यास दुकानांचा परवाना कायम रद्द करण्यात येणार असल्याची ताकीद दाेन्ही दुकानदारांना देण्यात आली.
...
परवाना रद्द करण्याची ताकीद
या दाेन्ही दुकानांच्या चाैकशीत लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकांवर धान्य दिल्याच्या नोंदी नसणे, त्यांना ‘ई पॉस’ मशीनची पावती न देणे, विक्री रजिस्टर प्रमाणित नसणे, गहू व तांदळाचा साठा पुस्तकी साठ्यापेक्षा कमी आढळणे, एका ग्राहकाला नऊ महिन्यांचे रेशन न देणे तसेच तामसवाडी येथील दुकानात दुकानाचा वेळफलक नसणे, योजनानिहाय लाभार्थ्यांची यादी दर्शनी भागावर न लावणे, स्वत:च्या नावावर दुकान असून ते दुसऱ्याला चालवायला देणे, मृत व्यक्तीच्या नावे धान्याची उचल करणे, नामफलक ठरावीक नमुन्यात नसणे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राप्त नियतन वाटपामध्ये २.६७ क्विंटलची घट स्टॉकबुकमध्ये नोंदविणे, एका ग्राहकाला तीन व्यक्तींचे रेशन कमी देऊन पूर्ण व्यक्तीची पावती काढणे या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या दुकानदारांना त्यांचा दुकान परवाना रद्द करण्याची ताकीद दिली आहे.
...
असमाधानकारक स्पष्टीकरण
जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दाेन्ही दुकानदारांना त्यांची मते मांडण्याची व संपूर्ण रेकाॅर्डसह लेखी स्पष्टीकरण सादर करण्याची संधी दिली हाेती. यात दाेन्ही दुकानदारांनी प्रशासनाचे समाधान हाेईल, असे स्पष्टीकरण सादर केले नाही. त्यामुळे त्यांना धान्यचाेरी व अन्य नियमांच्या उल्लंघनास जबाबदार धरण्यात आले. पहिल्या कारवाईमध्ये त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. त्यांनी याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हा पुुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिले. प्रत्येक दुकानदार हा सेवक असताे. तो चोरी करीत असेल तर त्याची त्वरित वरिष्ठ अधिकारी व पोलिसांत तक्रार करावी, असे मत शेखर काेलते यांनी व्यक्त केले.