नैराश्यामुळे मुले होतात लैंगिकतेत सक्रिय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:34 AM2018-09-30T00:34:12+5:302018-09-30T00:35:23+5:30

अलीकडच्या काळातील जीवनशैलीमुळे किशोरावस्थेतील मुले लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय झाली आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती, लैंगिक साहित्य आणि साधनांची सहज उपलब्धता, शैक्षणिक जीवनात येणारा एकटेपणा आणि त्यामुळे आलेले नैराश्य आदी कारणांनी मुले लैंगिक सक्रिय होतात, असा सूर ‘नार्चीकॉन-२०१८’च्या परिषदेत वक्त्यांनी व्यक्त केला.

Depression causes children to become sexually active | नैराश्यामुळे मुले होतात लैंगिकतेत सक्रिय 

नैराश्यामुळे मुले होतात लैंगिकतेत सक्रिय 

Next
ठळक मुद्देनार्चीकॉन परिषदेत वक्त्यांचा सूर : किशोरवयीन मुलांमधील लैंगिकतेवर चर्चा


नागपूर : अलीकडच्या काळातील जीवनशैलीमुळे किशोरावस्थेतील मुले लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय झाली आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती, लैंगिक साहित्य आणि साधनांची सहज उपलब्धता, शैक्षणिक जीवनात येणारा एकटेपणा आणि त्यामुळे आलेले नैराश्य आदी कारणांनी मुले लैंगिक सक्रिय होतात, असा सूर ‘नार्चीकॉन-२०१८’च्या परिषदेत वक्त्यांनी व्यक्त केला.
‘किशोरवयीन मुलांमधील लैंगिकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. श्रीकांत चोरघडे, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. प्राजक्ता कडूस्कर, डॉ. मंजुश्री गिरी, डॉ. मीना देशमुख, डॉ. स्वाती वाघमारे, डॉ. गुप्ता, डॉ. राजू मोहता हे सहभागी झाले होते.
डॉ. गिरी म्हणाल्या, आजची मुले खूप जागरूक आहेत. ते जे बघतात त्यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुलांच्या जीवनात यासाठी प्रसिद्धीमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या चुकीच्या प्रदर्शनामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही अशा चुकीच्या गोष्टी असतात ज्यामुळे त्यांच्या मनात चुकीच्या समजूती घर करू लागते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्या मुलांशी याविषयी चर्चा करताना खूप समस्या येतात. यासंबंधी बोलणे त्यांना सोपे जात नाही. पण हे तडजोड करण्यासारखे कारण नाही. लक्षात ठेवा आपल्या मुलांचे चांगले भवितव्य त्यांच्या पालकांनी दिलेल्या लैंगिक शिक्षणावरही अवलंबून असते, असेही त्या म्हणाल्या. डॉ. मेहता म्हणाले, जेव्हा आपले मूल तारुण्यात पाऊल ठेवायला लागेल तेव्हाच लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करावी. कारण त्यांचे हेच वय अधिक घातक ठरू शकते. त्यांच्या शरीरात वेगवेगळे बदल होतात. अशा वेळेस त्यांना माहिती नसल्याने वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. त्यांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे, मी कसा जन्माला आलो किंवा मुलांचा जन्म कसा होतो. जर या संधीचा फायदा घेत आपण प्रश्नांची नीट उत्तरे दिली नाहीत तर पुढे ते जे बाहेरील जगाकडून मिळवतील व त्यावर विश्वास ठेवतील. संचालन डॉ. निशिकांत कोतवाल यांनी केले. यावेळी डॉ. अविनाश गावंडे व ‘एएचए’चे सदस्य उपस्थित होते.
बाल लैंगिक अत्याचारावर उपचार बंधनकारक
यावेळी सहभागी तज्ज्ञांनी सांगितले, लैंगिक अत्याचाराची विशेषत: बाल लैंगिक अत्याचाराचे कुठलेही प्रकरण आले तर प्रत्येक डॉक्टरला उपचार करणे कायद्याने बंधनकारक आहे, शिवाय तपासण्याची पद्धतही ठरवून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाला बाल लैंगिक अत्याचारावर उपचारात्मक गोष्टी शिकणे आवश्यक आहे.

Web Title: Depression causes children to become sexually active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.