२२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदावनती

By admin | Published: August 28, 2014 02:02 AM2014-08-28T02:02:46+5:302014-08-28T02:02:46+5:30

आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ५ वी किंवा १ ली ते ७ वीपर्यंतच्या ज्या शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे, अशा शाळांवरील २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना सहायक शिक्षक पदावर

Deputation of 222 High Class Headmasters | २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदावनती

२२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदावनती

Next

जिल्हा परिषद : पटसंख्या घटल्याचा फटका
नागपूर : आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ५ वी किंवा १ ली ते ७ वीपर्यंतच्या ज्या शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे, अशा शाळांवरील २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना सहायक शिक्षक पदावर पदावनत करण्यात आले, तर सेवाज्येष्ठतेनुसार ११६ उच्च श्रेणी शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रि या बुधवारी जिल्हा परिषदेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात पार पडली.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम(आरटीई)२००९ या कायद्यानुसार १५० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेवर उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची नियुक्ती करता येते. जिल्ह्यातील अशा शाळांवर कार्यरत ३३८ उच्च श्रेणी मुख्याध्यापक अतिरक्त ठरले आहेत.
यातील ११६ जणांचे सेवाज्येष्ठतेच्या आधारावर त्याच पदावर तर २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना पदावनती देऊन समायोजन करण्यात आले आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापक ांना सहायक शिक्षक पदावर पदावनती दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी ललित रामटेके यांनी दिली.
जि.प.मध्ये समायोजन असल्याने शिक्षकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. पदावनती झालेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या वेतनात क ोणताही बदल केला जाणार नाही. परंतु त्यांना आता वेतनवाढ व इतर लाभ मिळणार नाही. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील लोकसंख्या ३५ लाखांवर गेली आहे. मागील काही वर्षांत जि.प. शाळांतील पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. पटसंख्या कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)

Web Title: Deputation of 222 High Class Headmasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.