वीज दरवाढीच्या फेररचनेसाठी मनसेचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 09:23 PM2020-02-05T21:23:31+5:302020-02-05T21:25:16+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विजेच्या वाढलेल्या दरांमध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

Deputation of MNS to Energy Minister for restoration of power tariff | वीज दरवाढीच्या फेररचनेसाठी मनसेचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन 

वीज दरवाढीच्या फेररचनेसाठी मनसेचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विजेच्या वाढलेल्या दरांमध्ये कपात करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. महागाई आणि जागतिक मंदीमुळे जनता होरपळलेली असताना हा वीज दरवाढीचा बोजा सहन करण्यापलीकडचा आहे. त्यामुळे त्यात कपात करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे यांचा प्रमुख उपस्थितीत तसेच शहर सचिव घनश्याम निखाडे व मध्य नागपूर अध्यक्ष शशांक गिरडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
० ते १०० युनिटचे सध्याचे विजेचे दर ३.०५ रुपये प्रति युनिट आहेत. ते कमी करून ० ते २०० युनिटपर्यंत २.०५ रुपये प्रति युनिट करावे तसेच मंदीमुळे नागपुरातील व्यापाऱ्यांवर आलेला ताण लक्षात घेता व्यावसायिक विजेचे दरसुद्धा कमी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील मंदिरे, मशीद, बुद्धविहार महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आले. परंतु रस्त्यावरील विद्युत खांबांकडे वीज वितरण कंपनीचे नेहमीच दुर्लक्ष असते. यामुळे प्रसंगी अपघातामुळे नाहक बळी जातो. हे खांब हटविण्याचीही मागणी करण्यात आली. इतवारी निकालस मंदिर परिसरात भूमिगत लाईन करावी, विजेच्या बिलावर प्रति युनिटच्या व्यतिरिक्त आकारले जाणारे छुपे दर रद्द करावे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. या संपूर्ण विषयावर ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात मनसे नागपूर शहर सचिव घनश्याम निखाडे, मध्य नागपूर अध्यक्ष शशांक गिरडे, पूर्व नागपूर अध्यक्ष उमेश उत्तखेडे, मध्य विभाग उपाध्यक्ष सुमित वानखेडे, आशीष पांढरे, अरविंद सावरकर, धीरज गजभिये, राजू पत्राळे, धीरज चिचघरे, ओंकार चन्ने, शुभम तिडके, सतीश रहांगडाले, सुरज सारवा, मोहन रामटेके, जितू गणगोज आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Deputation of MNS to Energy Minister for restoration of power tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.