उपमुख्यमंत्री अजित पवार ‘विजयगड’वरूनही कारभार पाहणार; नागपूर येथे कार्यालय कार्यान्वित

By आनंद डेकाटे | Published: January 10, 2024 03:44 PM2024-01-10T15:44:05+5:302024-01-10T15:44:21+5:30

विदर्भवासियांची मुंबईवारी टळणार

Deputy Chief Minister Ajit Pawar will also take charge from 'Vijaygarh'; | उपमुख्यमंत्री अजित पवार ‘विजयगड’वरूनही कारभार पाहणार; नागपूर येथे कार्यालय कार्यान्वित

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘विजयगड’वरूनही कारभार पाहणार; नागपूर येथे कार्यालय कार्यान्वित

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नागपुरात विजयगड हा शासकीय बंगला नव्यानेच तयार करण्यात आला आहे. अधिवेशन काळात उपुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी का बंगला तयार करण्यात आला असला तरी तो आता उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नागपूर विभागीय कार्यालय म्हणून कार्यरत राहील. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरंच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागपूरमधील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरंच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी सचिन यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar will also take charge from 'Vijaygarh';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.