Nagpur: सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

By जितेंद्र ढवळे | Published: May 1, 2023 03:35 PM2023-05-01T15:35:13+5:302023-05-01T15:35:37+5:30

Devendra Fadnavis : सर्वसामान्य माणसाला आरोग्याविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis promises to build a health system that is affordable for common people | Nagpur: सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

Nagpur: सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

googlenewsNext

नागपूर : यंदाच्या अर्थसंकल्पात पाचशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर 317 दवाखाने सोमवारी राज्यभरात सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात 12 दवाखाने सुरु झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला आरोग्याविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीने मुंबईवरुन  या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात 317 ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यातील 12 ठिकाणांचा यात समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती होती. उस्मानाबादहून आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत उपस्थित होते.

या दवाखान्याच्या माध्यमातून 30 विविध सेवा निःशुल्क देण्यात येणार आहे. या दवाखान्यांमध्ये विविध एक्सपर्टला बोलावून एक्सपर्ट कन्सल्टेशन देखील निःशुल्क मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून सुरू होत असून आपल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात आज त्याचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकार्पणप्रसंगी आ.प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य उपसंचालक डॅा. विनिता जैन यांच्यासह महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 12 ठिकाणी शुभारंभ
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्ह्यात बारा ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रामुख्याने समावेश आहे. शहरातील डोरले ले आऊट,  ग्रामीणमधील हिंगणा, कामठी, कुही ,मौदा, वाडी, मोवाड ता. नरखेड, पारशिवणी, रामटेक, थापा ता. सावनेर, उमरेड आणि भिवापूर अशा 12 ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

निःशुल्क तपासणी, उपचार आणि औषधी

आपला दवाखान्यामध्ये मोफत उपचार, तपासणी आणि औषधी देण्यात येणार आहेत. दवाखान्यात सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे. बाह्यरुग्ण सेवा, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी लसीकरण या सुविधा प्रामुख्याने पुरविण्यात येणार आहेत.

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis promises to build a health system that is affordable for common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.