अवैध ऑनलाइन लॉटरीला कायद्याचा चाप लावणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:53 AM2022-12-29T05:53:42+5:302022-12-29T05:54:23+5:30

ऑनलाइन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल.

deputy cm devendra fadnavis said Illegal online lottery to be control by law | अवैध ऑनलाइन लॉटरीला कायद्याचा चाप लावणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती 

अवैध ऑनलाइन लॉटरीला कायद्याचा चाप लावणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : ऑनलाइन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल. अवैध ऑनलाइन लॉटरीच्या प्रतिबंधासाठी कायद्यात संशोधन करून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. 

सदस्य दिलीप लांडे यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला.. त्यावर फडणवीस म्हणाले की, राज्यात उपसंचालक लॉटरी, नवी मुंबई यांच्यामार्फत पेपर लॉटरी चालविण्यात येते. महाराष्ट्रात ऑनलाइन पद्धतीची लॉटरी चालविण्यात येत नाही. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे बेकायदा ऑनलाइन लॉटरी सुरू असलेल्या आस्थापना व व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येते. मात्र तक्रारचनसल्याने गुन्हा दाखल नाही. चर्चेत रईस शेख, राहुल आहेर आदींनी सहभाग घेतला.  

दोन वर्षांत २६७ गुन्हे 

महाराष्ट्रात सन २०२० ते २०२२ पर्यंत एकूण २६७ गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १३४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: deputy cm devendra fadnavis said Illegal online lottery to be control by law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.