संचमान्यतेचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:12+5:302021-01-03T04:09:12+5:30
नागपूर : ऑनलाईन संचमान्यता ही अतिशय त्रृट्यात्मक व त्रासदायक असल्याने संचमान्यतेचे अधिकार हे शिक्षण उपसंचालकांना द्यावे, अशी मागणी राज्यातील ...
नागपूर : ऑनलाईन संचमान्यता ही अतिशय त्रृट्यात्मक व त्रासदायक असल्याने संचमान्यतेचे अधिकार हे शिक्षण उपसंचालकांना द्यावे, अशी मागणी राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांच्या संघटनांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. कडू यांनी शिक्षक संघटनांच्या मागणीची दखल घेऊन त्यासंदर्भात शिक्षण संचालकांना निर्देश दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांच्याशी बैठक केली. या बैठकीत विविध तक्रारी शिक्षकांनी मांडल्या. खोटी पटसंख्या दाखविल्यास दंडात्मक तरतुदीच्या सूचना असाव्यात, वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करताना प्रशिक्षणातून सूट देण्यात यावी. शिपायाला मानधनावर नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करावा. शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या शालार्थ आयडी यासंबंधी तक्रारी व अनियमितता तपासावी. नागपूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी पदे तातडीने भरावीत, यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीला राजेश शिंदे, प्रमोद रेवतकर, अनिल गोतमारे, आदी उपस्थित होते.