आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ‘डर्मेटो सर्जरी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:03+5:302021-07-20T04:07:03+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानाचा, अनुभवाचा विचार महत्त्वाचा ठरतो. सोबतच एकूण देहबोलीचाही विचार आवश्यक ठरतो. त्यादृष्टीने ...

Dermato Surgery for Attractive Personality! | आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ‘डर्मेटो सर्जरी’!

आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ‘डर्मेटो सर्जरी’!

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानाचा, अनुभवाचा विचार महत्त्वाचा ठरतो. सोबतच एकूण देहबोलीचाही विचार आवश्यक ठरतो. त्यादृष्टीने व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो; मात्र ऐन तारुण्यात शरीरावर आलेल्या पांढऱ्या डागाने किंवा टक्कल पडल्याने किंवा चेहऱ्यावरील मुरुमांमुळे अनेकदा सामाजिक कुचंबनेला सामोरे जावे लागते. याची दखल घेत मेडिकलच्या त्वचारोग विभागाने पुन्हा एकदा ‘डर्मेटो सर्जरी’साठी पुढाकार घेतला आहे. ‘एनएमसी’च्या नियमानुसार ‘पीजी’च्या जागा वाचविण्यासाठी हा अभ्यासक्रमही आवश्यक आहे.

आजही समाजात या पांढऱ्या डागाला घेऊन अनेक गैरसमज आहेत. विशेष म्हणजे, अगांवरील पांढऱ्या डागाचा कुष्ठरोग आणि कोड यांचा परस्परांशी काहीही संबंध नसताना काही जण संबंध जोडू पाहतात. परिणामी, हे डाग लपवण्यासाठी अनेक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात, मनात न्यूनगंड बाळगतात. या आजारावर औषधे, गोळ्या, क्रिम्स, अतिनील किरणांचा वापर, त्वचारोपण, ‘मिनी पंच ग्राफटींग’, ‘टॅटुईग’ आदी शस्त्रक्रिया आहेत. चेहऱ्यावरच्या सूरकुत्या नाहीशा करण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ‘बोटाक्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट’ आहे. खूप जास्त प्रमाणात असलेल्या मुरुमांवर ‘अ‍ॅकनेक सर्जरी’ तर, टक्कल पडलेल्या जागेवर ‘हेअर ट्रान्सप्लांट’ आहे. मेडिकलच्या त्वचारोग विभागात यावर उपचार होत असले तरी ‘डर्मेटो सर्जरी’ची सोय नसल्याने रुग्णसेवा अडचणीत येत असल्याचे वास्तव आहे.

डर्मेटो सर्जरी सुरू करण्याचा एमसीआयच्या सूचना

सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये या ‘डर्मेटो सर्जरी’ मोठ्या प्रमाणात होत आहेत. याचे प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी पूर्वीच्या ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय)२०१६ मध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना त्वचारोग विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाडी ‘डर्मेटो सर्जरी’ अनिवार्य केले. त्यानुसार मेडिकलने किरकोळ शस्त्रक्रिया गृह, ‘हिस्टोपॅथोलॉजी’ विभागा’साठी तंत्रज्ञ, ‘कॉस्मेटोलॉजी’ विभागासाठी उपकरण, अद्ययावत लायब्ररी यांसह शल्यचिकित्सक, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविला होता. २०१८ मध्ये पुन्हा एकदा मेडिकलने प्रस्ताव पाठविला; परंतु मंजुरीच मिळाली नाही. यामुळे सध्याचे ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ (एनएमसी) याबाबत त्रुटी काढून ‘पीजी’च्या जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे विभागाने ‘डर्मेटो सर्जरी’ करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.

डर्मेटो सर्जरी आवश्यकच

त्वचा रोग विभागात सर्वच प्रकारचे रुग्ण येतात. विशेषत: पांढरे डाग, मुरुम, टक्कल असणाऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात; परंतु ‘डर्मेटो सर्जरी’ होत नसल्याने आमचाही नाईलाज होत होता. आता पुन्हा एकदा यासाठी प्रयत्न केला जात आहे.

-डॉ. जयेश मुखी, प्रमुख त्वचारोग विभाग, मेडिकल .

-यावर होईल उपचार

::पांढरे ढाग

:: चेहऱ्यावरील मुरूम

:: टक्कल

:: वेडेवाकडे नख

:: चेहऱ्यावरील सुरकुत्या

Web Title: Dermato Surgery for Attractive Personality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.