नराधमाला मृत्युदंडच द्यावा कुटुंबीयांची मागणी :

By admin | Published: May 25, 2016 02:38 AM2016-05-25T02:38:47+5:302016-05-25T02:38:47+5:30

अंगावर काटे उभे करणाऱ्या त्रासदायक घटनेनंतर कांद्री येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शांत आहे.

Deshada's death sentence demands family | नराधमाला मृत्युदंडच द्यावा कुटुंबीयांची मागणी :

नराधमाला मृत्युदंडच द्यावा कुटुंबीयांची मागणी :

Next

त्यांच्या मुलीला मिळाला पुनर्जन्म
रिता हाडके नागपूर
अंगावर काटे उभे करणाऱ्या त्रासदायक घटनेनंतर कांद्री येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शांत आहे. तिचे नातेवाईक असो की आई-वडील इच्छा असून कुणाकडे काहीही बोलण्यास असमर्थ आहेत. गंभीर जखमांचे दु:ख सहन करीत नागपूरच्या इस्पितळात मृत्यूचा सामना करीत असलेल्या निर्भयासोबत झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे प्रत्येकाचे रक्त खवळत आहे.
मेयो इस्पितळात तिला पाहण्यासाठी येणारे परिचित व काही सामाजिक संघटनांचे लोक पोहचत आहेत. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाकडे ती फक्त पाहत राहते. डोळ्यासमोर तो प्रसंग येताच अश्रू वाहू लागतात.
पीडित मुलीचे नातेवाईक नराधमाला मृत्युदंड देण्याची मागणी करीत आहेत. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजता रामटेक कांद्री माईन्सच्या परिसरात घडली. मजूर कुटुंबात जन्मलेली किशोरी आठव्या वर्गात शिकते. सकाळी शौचालयावरून तिला परत येताना पाहून तिच्या परिचित असलेला नराधम महेश रौतेलने (४५) याने तिला आवाज देऊन बोलावले होते. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

सत्तूरने ‘तिच्या’ हातावर वार
नागपूर : तिने प्रखर विरोध केला असता आरोपीतील राक्षसीवृत्ती जागी झाली. त्याने त्याच्या जवळील सत्तूर काढून तिच्या हातावर वार केला. तिने शक्ती पणाला लावली व पळ काढला. आरोपीने तिला लगेच गाठले व तिच्या गळावर तसेच चेहऱ्यावरही गंभीर वार केले. ती घरी पोहचली तेव्हा रक्ताने माखली होती. गळा मोठ्या प्रमाणात कापल्या गेला होता. कुटुंबीयांनी तिला लगेच रामटेक येथे व नंतर नागपुरातील मेयो इस्पितळात उपचारासाठी भरती केले. तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला सर्जरी विभागात ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर आता ती धोक्यातून बाहेर आली आहे.
तिचा जीव वाचला आहे. मृत्यूचा सामना करणाऱ्या या मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, देवाच्या कृपेने त्यांच्या मुलीला पुनर्जन्मच मिळाला आहे. (प्रतिनिधी)

बेलपत्र विकून मुलीचे पालन
मुलीचे आई-वडील गरीब आहेत. कधी काम मिळाले नाही तर बेलपत्र विकून ते आपले घर चालवितात. यासाठी ते नागपूरच्या आठवडी बाजारात येतात.

सैतानाला म्हणत राहिली ‘मोठे बाबा’
आरोपी रौतेल हा पीडित मुलीच्या घराशेजारीच राहतो. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. ती आरोपीला मोठे बाबा म्हणायची. आरोपी नेहमी मुलीला जवळ बोलवायचा. खाण्याच्या वस्तू देऊन तिची गंमतही करायचा. त्यामुळे मुलीला त्या नराधमाच्या सैतानीवृत्तीचा अंदाज नव्हता.

Web Title: Deshada's death sentence demands family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.