सीबीआय चाैकशीनंतर देशमुख काटाेलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:09 AM2021-04-25T04:09:01+5:302021-04-25T04:09:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : तब्बल १२ तास सीबीआय चाैकशीला सामाेरे गेल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तब्बल १२ तास सीबीआय चाैकशीला सामाेरे गेल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास काटाेल शहरातील क्वारंटाईन व काेविड केअर सेंटरला भेट दिली. यात त्यांनी सेंटरमधील सुविधांचा आढावा घेतला.
काटाेल शहरातील लक्ष्मीनगर येथील तिरुपती सभागृहात काेविड क्वारंटाईन सेंटर तसेच शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-६ मध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दाेन्ही सेंटरला शनिवारी भेट देणार हाेते. मात्र, सकाळी सीबीआयची चमू त्यांच्या नागपूर येथील बंगल्यावर दाखल झाल्याने ते आधी चाैकशीला सामाेरे गेले. चाैकशी आटाेपताच सायंकाळी ५ वाजता नागपूरहून काटाेलच्या दिशेने रवाना झाले. मध्येच सीबीआय अधिकाऱ्यांचा फाेन आल्याने ते कळमेश्वरहून नागपूरला परत आले आणि नंतर रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास काटाेल शहरात दाखल झाले.
यावेळी त्यांनी तिरुपती सभागृहातील क्वारंटाईन सेंटर व शाळा क्रमांक-६ मधील काेविड केअर सेंटरला भेट देत तेथील कामाचा व सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार नीलेश कदम, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे, बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके, चंद्रशेखर काेल्हे, चंद्रशेखर चिखले, अनुप खराडे, अयुब पठाण, अमित काकडे, पंकज मानकर, रूपेश नाखले, मुन्ना पटेल, बालू नासरे उपस्थित हाेते.