देशमुख काका-पुतण्यात जुंपली, भगोडा आमदार म्हणत डिवचले

By निशांत वानखेडे | Published: October 16, 2024 05:37 PM2024-10-16T17:37:47+5:302024-10-16T17:39:15+5:30

Nagpur : काटोलात १८ पासून जनसंवाद यात्रा

Deshmukh uncle-nephew fight, called him a fugitive MLA | देशमुख काका-पुतण्यात जुंपली, भगोडा आमदार म्हणत डिवचले

Deshmukh uncle-nephew fight, called him a fugitive MLA

कमलेश वानखेडे- नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुतणे माजी आ. आशीष देशमुख यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. आशीष हे मागील काळात दिसले नाही. निवडणून जिंकले तेव्हा तीन वर्षात काटोलच्या जनतेला सोडून गेले. भगोडा आमदार अशी आशिष देशमुख यांची ओळ्ख आहे. आता पुन्हा अवतरत आहे, अशा शब्दात अनिल देशमुख यांनी थेट टीका केली.

बुधवारी पत्रकार परिषदेत अनिल देशमुख व सलील देसमुख यांनी काटोल मतदारसंघात १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जनसंवाद यात्रा काढण्याची घोषणा केली. ही यात्रा व्याहाड ते मोवाड अशी दोन टप्प्यात असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न, कापूस, पीक विमा, जीएसटीमुळे वाढलेल्या खताच्या किंमती आदी मुद्दे यात्रेदरम्यान जनतेसमोर मांडले जातील. उद्योग गेले, महागाई वाढली, शेतकरी नाराज आहे, याचा बदला लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी मतदारसंघात अनेक वर्ष काम केले आहे. पळून गेलो नाही, कोरोनात लोकांची सेवा करण्याचे काम केले, शेतकरी यांच्यासाठी धावून जाण्याचं काम आम्ही केले, असे सलील देशमुख म्हणाले.

शरद पवार विदर्भात येतील तेव्हा अनेकांचे प्रवेश
निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विदर्भात येतील. त्यामुळे बरेच दिग्गज लोक पक्षात प्रवेश घेतील, असा दावा अनिल देशमुख यांनी केले.

Web Title: Deshmukh uncle-nephew fight, called him a fugitive MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.