शिवसेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 08:21 PM2018-12-24T20:21:43+5:302018-12-24T20:23:18+5:30

आगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. मात्र अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही ते म्हणाले.

The desire of the people to fight Shiv Sena-BJP together: Raosaheb Danwe | शिवसेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा : रावसाहेब दानवे

शिवसेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा : रावसाहेब दानवे

Next
ठळक मुद्दे युतीबाबत मात्र अद्याप बोलणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. मात्र अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही ते म्हणाले.
नागपुरात पक्षाच्या कामानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे यांना भाजप-शिवसेना युतीबाबत विचारले असता समविचारी पक्षाशी युती व्हावी, हे भाजपचे सुरुवातीपासून धोरण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभाजनाचा लाभ मिळू नये म्हणून भाजप-शिवसेनेची युती होणे आवश्यक आहे. राफेल घोटाळ्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांविषयी दानवे यांना विचारले असता आता न्यायालयाचा निर्णय आला आहे, त्यामुळे विषयच उरला नाही, असे ते म्हणाले. सोबतच ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे आणि चंदन गोस्वामी उपस्थित होते.
नागपुरात होणार अनुसूचित जाती-जमातीचे अधिवेशन
१९ व २० जानेवारी रोजी नागपुरात भाजपतर्फे अनुसूचित जाती-जमातीचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. समारोपाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The desire of the people to fight Shiv Sena-BJP together: Raosaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.