प्रवासी नको नको म्हणत असूनही चालकाने बस पुलावरून नेली आणि घडले अघटित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 05:31 PM2021-09-28T17:31:05+5:302021-09-28T17:31:44+5:30

Nagpur News तब्बल २४ वर्षे विनाअपघात सेवा करूनही एका बेसावध क्षणी चालकाचा आत्मविश्वास नडला. पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहन घातले. अखेर अनर्थ घडला.

Despite the passengers saying no, the driver took the bus off the bridge and the accident happened. | प्रवासी नको नको म्हणत असूनही चालकाने बस पुलावरून नेली आणि घडले अघटित..

प्रवासी नको नको म्हणत असूनही चालकाने बस पुलावरून नेली आणि घडले अघटित..

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ वर्षांच्या सेवेत पहिलीच चूक ठरली गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तब्बल २४ वर्षे विनाअपघात सेवा करूनही एका बेसावध क्षणी चालकाचा आत्मविश्वास नडला. पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहन घातले. अखेर अनर्थ घडला. महामंडळाची बस प्रवाशांसह पुरात वाहून गेली. काठावरच्या गावकऱ्यांनाही केवळ धावाधाव करण्यापलीकडे काहीच करता आले नाही. नागपुरातील घाट रोड आगर-क्र. १ ची ही बस आहे. (Despite the passengers saying no, the driver took the bus off the bridge and the accident happened.)

नांदेडहून नागपूरकडे प्रवासी घेऊन निघालेल्या बसच्या या अपघातामुळे वातावरणच सुन्न झाले आहे. एसटी महामंडळाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सतीश रंगप्पा सूरेवार (५३, बॅच क्र. १०७६१) आणि वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर (५६, बॅच क्र. २८३९५) हे सोमवारी सकाळी ६ वाजता प्रवासी घेऊन नागपूरवरून नांदेडला एम.एच. १४, बी.टी. ५०१८ क्रमांकाच्या बसने निघाले होते. दुपारी १ बस वाजता पोहोचली. विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळी ५.१८ वाजता हे दोघेही परतीच्या फेरीसाठी नांदेडवरून निघाले. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणालीनुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते, अशी नोंद आहे. त्यातील ४ हदगाव आणि ४ प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. हदगावमध्ये प्रवासी चार उतरविल्यावर उमरखेडवरून ही बस ७.३० वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेडपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर आहे. उमरखेड-पुसद मार्गावरील दहागाव पुलावर पुराचे पाणी होते. हा सरावाचा मार्ग असल्याने आणि आदल्या दिवशी फारशे पाणी नसल्याने चालकाने पुलावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाहामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ही वाहून गेली.

चालकाला मार्गावर १५ वर्षांचा अनुभव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक सतीश सुरेवार यांना एसटी महामंडळामध्ये २४ वर्षांचा अनुभव असून १९९७ मध्ये ते महामंडळात रुजू झाले होते. पुढील दोन वर्षांनी ते निवृत्त होणार होते. या काळात त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. नागपूर- नांदेड या मार्गावरील सेवेचा त्यांना मागील १५ वर्षांपासून अनुभव होता. रात्रंदिवस असलेल्या या सरावाच्या मार्गवरच नको ते साहस जिवावर बेतले. वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर यांचीही महामंडळातील सेवा उत्तम होती.

सोमलवाडा, दिघोरीत शोककळा

या अपघातामधील चालक आणि वाहक नागपुरातीलच आहेत. चालक सतीश रंगप्पा सुरेवार हे सोमलवाडा येथे राहतात. त्यांना एक मुली, पत्नी असा परिवार आहे. तर, वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर हे दिघोरीला राहतात. त्यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. सकाळी टीव्हीवरून ही बातमी सर्वत्र झळकताच या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातग्रस्त बस नांदेडहून नागपूरला येत होती हे कळल्यावर पुढच्या दुर्घटनेची कल्पना आल्याने एकच हलकल्लाेळ उडाला.

...

Web Title: Despite the passengers saying no, the driver took the bus off the bridge and the accident happened.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात