निराश्रित भाचीला वेश्याव्यवसायात ढकलले

By admin | Published: May 10, 2015 02:18 AM2015-05-10T02:18:46+5:302015-05-10T02:18:46+5:30

निराश्रित अल्पवयीन भाचीला तिच्या सख्ख्या मोठ्या आईनेच (आईची मोठी बहीण) वेश्याव्यवसायात ढकलले....

The destitute pimp pushed into prostitution | निराश्रित भाचीला वेश्याव्यवसायात ढकलले

निराश्रित भाचीला वेश्याव्यवसायात ढकलले

Next

नागपूर : निराश्रित अल्पवयीन भाचीला तिच्या सख्ख्या मोठ्या आईनेच (आईची मोठी बहीण) वेश्याव्यवसायात ढकलले. तब्बल तीन वर्षांपासून नरकयातना भोगणाऱ्या या मुलीने अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर सेवाभावी महिलांच्या मदतीने सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली. तिच्या दलाल साथीदाराचा शोध सुरू आहे.
पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. लहानपणीच तिच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी दुसरा घरठाव करून या मुलीला निराश्रित केले. त्यामुळे साडेतीन ते चार वर्षांपूर्वी ती अजनीतून तिच्या मोठ्या आईच्या आश्रयाला आली. तिची मोठी आई आरोपी मंदा सुरेश बोंगीरवार हिच्या सदरमधील घरी राहात असताना तीन वर्षांपूर्वी (ती अवघी १२ वर्षांची असताना) एका आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. मंदाने मुलीसमान भाचीला मदत करण्याऐवजी एका दलालाच्या माध्यमातून वेश्याव्यवसायात ढकलले. कामठी आणि सीताबर्डीतील विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मंदा आणि तिचा साथीदार या मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेऊ लागले. या दोघांना मोठी रक्कम देऊन ग्राहक या मुलीवर पाशवी अत्याचार करू लागले.
तीन वर्षांपासून नरकयातना भोगणारी ही मुलगी दोन दिवसांपूर्वी अजनीतील आपल्या जुन्या घरी पोहचली.
तेथील परिचित महिलांना तिने आपली कैफियत ऐकवली. काही सेवाभावी महिलांनी तिला लगेच अजनी ठाण्यात नेले. प्रकरण सदर परिसरातील असल्यामुळे अजनी पोलिसांनी त्यांना सदरमध्ये पाठविले. येथे ठाणेदार रफिक बागवान यांनी माहिती ऐकून घेतल्यानंतर लगेच गुन्हा दाखल केला. पीएसआय पांडव, पीएसआय बागडे यांनी तपास करून आरोपी मंदाला अटक केली. आरोपी मंदाचा पती रेल्वेत होता. त्याचा मृत्यू झाल्यापासून ती एकाकी असल्याचे पोलीस सांगतात.(प्रतिनिधी)

Web Title: The destitute pimp pushed into prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.