वन्य प्राण्यांमुळे हरभऱ्याच्या पिकाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:21+5:302021-01-25T04:09:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : परिसरातील बाभूळखेडा, लाेणखैरी, खापा, चिचाेली, गुमथी, घाेगली शिवारात हरीण व राेही या वन्य प्राण्यांचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : परिसरातील बाभूळखेडा, लाेणखैरी, खापा, चिचाेली, गुमथी, घाेगली शिवारात हरीण व राेही या वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. या प्राण्यांनी हरभऱ्याच्या पिकाची प्रचंड नासाडी केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा, तसेच पिकाची याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मागील काही वर्षांपासून असून, त्यांची संख्या वाढत असल्याने नुकसानाचे प्रमाणही वाढत चालले आहे. याच प्राण्यांनी दाेन महिन्यांपूर्वी याच भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व तुरीच्या पिकाचे माेठे नुकसान केले हाेते. या नुकसानाच्या शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने वन कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले; परंतु अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.
याच वन्य प्राण्यांनी आता हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास वन्य प्राणाी हिसकावून घेत असल्याने त्यांचा वन विभागाने कायमचा बंदाेबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सविता जिचकार यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.