विध्वंसक घटनांना जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत

By admin | Published: December 27, 2014 03:07 AM2014-12-27T03:07:15+5:302014-12-27T03:07:15+5:30

देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन....

Destructive incidents cause imperfection in life | विध्वंसक घटनांना जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत

विध्वंसक घटनांना जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत

Next

नागपूर : देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले.
सोमलवार अ‍ॅकेडमी एज्युकेशन सोसायटीच्या ६० व्या संस्थापक दिन कार्यक्रमात शुक्रवारी त्यांचे ‘शिक्षणातून परिपूर्णतेकडे’ विषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे संस्थापक गोविंद काशीनाथ उपाख्य अण्णासाहेब सोमलवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संस्थापक दिन साजरा करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकर सोमलवार व्यासपीठावर उपस्थित होते.
आजच्या काळात इंटरनेटवर माहितीचा महासागर उपलब्ध आहे. हे ज्ञान व्यक्तीला नोकरी मिळवून देत असले तरी जीवनाला परिपूर्ण करण्यात मात्र मागे पडत आहे. विध्वंसक घटनांना ही बाब कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.
वैदिक काळातील शिक्षण पद्धतीमध्ये केवळ प्रशिक्षण नव्हते. त्यावेळी माणसे घडविण्याचे कार्य होत होते. आज विविध प्रकारची विद्या उपलब्ध आहे. यातील एक विद्या शिकण्यासाठी एक जन्म अपुरा पडू शकतो. परंतु, यापैकी एकही विद्या जीवन परीपूर्ण करू शकत नाही. जीवनाला परीपूर्ण करू शकेल तेच शिक्षण घेतले पाहिजे. जीवनाच्या परिपूर्णतेशिवाय कोणत्याही ज्ञानाला महत्त्व नाही. आपण बॉम्ब, वाहने, संगणक तयार करायला शिकलो, पण स्वत:वर संयम ठेवण्याची कला आपल्याला आजही येत नाही, अशी खंत पेन्ना यांनी व्यक्त केली. भारत ज्ञानाच्या आनंदात रमणारा देश आहे. जगातील पहिला ग्रंथ वेद भारतात लिहिला गेला. भारतातील ज्ञानच जगाला योग्य मार्ग दाखवू शकतो हे अनेकांनी मान्य केले आहे, असेही पेन्ना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चौकाचे सौंदर्य वाढले
नागपूर : तुकडोजी पुतळा चौकाकडून छोटा ताजबागकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात आल्याने या चौकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. या सोबतच अजनी पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Destructive incidents cause imperfection in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.