उपद्रव शोध पथक करणार नागपूरच्या स्वच्छता व शिस्तीची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:26 AM2019-11-29T11:26:36+5:302019-11-29T11:28:42+5:30

शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे.

The Detective Squad will monitor the cleanliness and discipline of Nagpur | उपद्रव शोध पथक करणार नागपूरच्या स्वच्छता व शिस्तीची देखरेख

उपद्रव शोध पथक करणार नागपूरच्या स्वच्छता व शिस्तीची देखरेख

Next
ठळक मुद्देसर्व प्रभागात एनडीएस जवान नियुक्त करणार८७ जवान कार्यरत, पुन्हा ६४ जणांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,प्लास्टिकचा वापर, थुंकणे व लघवी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. यात माजी सैनिकांचाच समावेश असावा, अशी तरतूद करण्यात आली होती. अशा एकूण १५१ जवानांची नियुक्ती करण्याला सभागृहाची मंजुरी आहे. परंतु यात सुरुवातीला ४६ जवानांची नियुक्ती करण्यात आली. शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेता, आयुक्त अभिजित बांगर यांनी पथकातील जवानांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात सध्या ८७ माजी सैनिक कार्यरत आहेत. पुन्हा ६४ जवानांनी भरती करून ही संख्या १५१ पर्यंत वाढवून त्यांची सर्व प्रभागात नियुक्ती केली जाणार आहे.
नागरी पोलिसांच्या धर्तीवर आरोग्य विभागाने उपद्रव शोध पथक गठित क रण्याचा निर्णय घेतला. २० जून २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत या पथकात १५१ माजी सैनिकांची भरती करण्याला मंजुरी देण्यात आली. तत्क ालीन आयुक्तांनी ८७ माजी सैनिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. परंतु ४६ जवानांचीच नियुक्ती करण्यात आली. शहराचा होत असलेला विस्तार विचारात घेता, उपद्रव शोध पथकातील जवानांची संख्या ८७ पर्यंत वाढविण्यात आली. शहरातील स्वच्छतेची समस्या, अतिक्रमण, प्लास्टिकचा वापर अशा घटनांना आळा घालण्यासाठी पथकात पुन्हा ६४ जवानांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
विशेष म्हणजे ७६ सुरक्षा जवान, १० सुपरवायझर, १ विशेष कार्य अधिकारी यांची ११ महिन्यांच्या मानधनावर नियुक्ती के ली जाणार आहे. यावर २ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये खर्च येत आहे. परंतु महापालिकेच्या तिजोरीतून हा खर्च करावा लागत नाही. पथकाकडून कारवाई करताना आकारण्यात येणाºया लाखो रुपयांच्या दंडाच्या रकमेतून मानधन दिले जात आहे. शहरातील अतिक्रमणाला आळा घालणे, प्लास्टिक कारवाई व डुक्कर पकडण्याच्या कामात पथकाची महत्त्वाची भूमिका आहे.
नवीन ६४ जवानांच्या नियुक्तीवर महापालिकेला ११ महिन्यात १.६९ कोटी खर्च करावे लागतील. परंतु दंडाच्या रकमेतून याहून अधिक रक्कम वसूल होण्याची अपेक्षा आहे.
दंडाची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव
सार्वजनिक जागेवर थुंकणे, लघवी केल्याचे आढळून आल्यास महापालिकेतर्फे अनुक्रमे १०० व २०० रुपये दंड आकारला जातो. महापालिका आयुक्तांनी ३१ आॅक्टोबर २०१९ ला दिलेल्या प्रस्तावात थुंकल्यास २०० रुपये व लघवी केल्यास ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्याची सूचना केली आहे. स्थायी समितीकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.
सुविधांच्या मोबदल्यात शुल्क द्यावे लागणार
शहरातील सार्वजनिक स्थळांची साफसफाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. खासगी व व्यावसायिक क्षेत्रासाठी महापालिकेतर्फे शौचालय, लिकेज काढणे, सेप्टिक टँक खाली करणे, बांधकामासाहित उचलण्याचे काम महापालिकेला करावे लागते. आता अशा सेवांसाठी खासगी व व्यावसायिकांना जादा शुुल्क द्यावे लागणार आहे. खासगी कामासाठी मोबाईल टॉयलेटसाठी प्रति दिवस ५ हजार, सामाजिक व धार्मिक कामासाठी लागल्यास प्रति दिवस २ हजार, शहराबाहेर ५ हजार व कारखाना विभागाने प्रति किलोमीटरनुसार निश्चित के लेल्या दरानुसार शुुल्क द्यावे लागेल. खासगी चोकेज काढण्यासाठी ५०० रुपये प्रति चोकेज, चेंबर, खासगी जेटिंग, सक्शनसाठी ५ हजार रुपये व कारखाना विभागाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटरनुसार जादाचे दर द्यावे लागतील. बिल्डिंग मटेरियल उचलण्यासाठी टिप्परच्या प्रत्येक फेरीसाठी २ हजार रुपये द्यावे लागेल.

 

Web Title: The Detective Squad will monitor the cleanliness and discipline of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.