अनेक दावे करूनही गांधीसागर तलावाची खस्ताहालत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:34+5:302020-12-17T04:36:34+5:30

रियाज अहमद नागपूर : नागपूर शहरातील गांधीसागर तलाव ऐतिहासिक आहे. परंतु याची देखभाल आणि सौंदर्यीकरणाबाबत प्रशासन थोडेही गंभीर नाही. ...

Deterioration of Gandhisagar Lake despite many claims () | अनेक दावे करूनही गांधीसागर तलावाची खस्ताहालत ()

अनेक दावे करूनही गांधीसागर तलावाची खस्ताहालत ()

Next

रियाज अहमद

नागपूर : नागपूर शहरातील गांधीसागर तलाव ऐतिहासिक आहे. परंतु याची देखभाल आणि सौंदर्यीकरणाबाबत प्रशासन थोडेही गंभीर नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही या तलावाची स्थिती अत्यंत खराब आहे. प्रशासनाने गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत मोठमोठे दावे केले होते. परंतु तलावाची अवस्था बिकट आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तीन वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.

‘लोकमत’च्या चमूने गांधीसागर तलावाच्या चारही बाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले. तलावाची सुरक्षा भिंत जर्जर झाली आहे.

काही ठिकाणी सुरक्षा भिंत तुटली आहे. सुरक्षा भिंतीचे रेलिंगही खराब झाले आहे. बहुतांश ठिकाणी रेलिंग गायब झाले आहे. तलावाच्या सुरक्षा भिंतीला लागून तयार करण्यात आलेल्या वॉकींग ट्रॅकची टाईल्स उखडली आहे. स्ट्रीट लाईट बंद आहेत. सुरक्षा भिंतीला लागुन असलेले लाईट तुटले आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रंगरंगोटी न झाल्यामुळे तलावाचा परिसर खराब दिसत आहे. तलावाच्या चारही बाजूनी अतिक्रमण झाले आहे. सन २०१७-१८ मध्य स्थानिक नगरसेवक प्रमोद चिखले यांनी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करून महापालिकेला सोपविला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला होता. तत्कालीन राज्य शासनाने ३२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मागील वर्षी त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने निविदा काढली होती. परतु कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यामुळे कंत्राट रद्द करण्यात आले. आताही हा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे. प्रस्तावासाठी १६ कोटी रुपये उपलब्ध आहेत. यात तत्कालीन राज्य शासनाने दिलेले १२ कोटी रुपये आणि महापालिकेच्या ४ कोटी रुपयांचा समावेश आहे. या प्रस्तावानुसार गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा दावा करण्यात आला आहे. या प्रस्तावापूर्वीही गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मोठमोठे दावे करण्यात आले होते. परंतु आतापर्यंत तलावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नवा प्रस्तावही त्याच दिशेने जात असल्याचे दिसत आहे. तलावाची सध्याची बिकट स्थिती त्याची साक्ष देत आहे.

...........

गांधीसागर तलावाची दुर्दशा

गांधीसागर तलावाची स्थिती चारही बाजूने बिकट झाली आहे. भाऊसाहेब पागे उद्यानाच्या दोन्ही बाजूची अवस्था बिकट आहे. टाईल्स उखडली असून रेलिंग गायब झाले आहे. फुटलेले लाईट, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे घाण पसरत आहे. परिसरात साहित्यही विखुरलेले आहे.

अतिक्रमणामुळे वॉकिंग करणेही कठीण

तलावाच्या चारही बाजूनी अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे सकाळी-सायंकाळी वॉकिंग करण्यासाठी येणाऱ्यांना अडचण येते. वॉकिंग ट्रॅकवर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालावे लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

भिंत पडल्यामुळे खाऊ गल्ली बंद

गांधीसागर तलावाची सुंदरता वाढविण्याचा दावा करून महापालिकेने खाऊ गल्ली सुरु केली. परंतु त्याकडेही दुर्लक्ष झाले. सुरक्षा भिंत पडल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून खाऊ गल्ली बंद आहे. आता खाऊ गल्लीतील ठेले सुभाष मार्गावर लागत आहेत.

विसर्जन टँकमुळे दुर्गंधी

तलावाच्या शेजारी गणेश मंदिराजवळ एक कोटी रुपये खर्च करून विसर्जन टँक तयार करण्यात आला होता. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे त्याची अवस्था बिकट झाली आहे. या टँकची स्वच्छता होत नाही. बाजूची गडरलाईन खराब झाल्यामुळे या टँकचे पाणी तलावात सोडण्यात येत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे विसर्जन टँकमधून दुर्गंधी येत आहे.

लवकरच निघणार निविदा

गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या मंजूर प्रस्तावाची नवी निविदा लवकरच काढण्यात येईल.त्यासाठी निधी गोळा करण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. सौंदर्यीकरणानंतर तलाव शहराची शोभा वाढविणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

-प्रमोद चिखले, सभापती, क्रीडा व सांस्कृतिक समिती

आतापर्यंत दावेच झाले

तलावाचे सौंदर्यीकरण मुंबईच्या नरिमन पॉईंटच्या धर्तीवर होणे आवश्यक आहे. चांगला वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सुविधा, स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. अतिक्रमण आणि अवेध बांधकाम हटविणे गरजेचे आहे. परंतु आतापर्यंत सौंदर्यीकरणाचे दावेच करण्यात आले. तलावाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या तलावाचे अस्तित्व संपत आहे.’

-राजेश कुंभलकर, अध्यक्ष, गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था

..........

Web Title: Deterioration of Gandhisagar Lake despite many claims ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.