आयकरच्या निर्धारित तारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:25+5:302021-05-21T04:08:25+5:30

- वित्त मंत्रालयाने जारी केले परिपत्रक : करदात्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय प्रत्यक्षकर बोर्डाने गुरुवार, २० ...

Determined dates of income tax | आयकरच्या निर्धारित तारखा

आयकरच्या निर्धारित तारखा

Next

- वित्त मंत्रालयाने जारी केले परिपत्रक : करदात्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय प्रत्यक्षकर बोर्डाने गुरुवार, २० मे रोजी परिपत्रक काढून वर्ष २०२१-२२मध्ये कर व विवरण भरणा आणि कम्प्लायन्सेस संदर्भातील निर्धारित विविध तारखा पुढे वाढवल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे तारखा वाढविण्याचे निवेदन अनेक व्यावसायिक संघटनांसह नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने वित्त मंत्रालयाकडे पाठवले होते. वित्त मंत्रालयाने त्याची दखल घेत आयकर, जीएसटी आणि कंपनी कम्प्लायन्सच्या निर्धारित तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे आयकर दात्यांना दिलासा मिळाला आहे. चेंबरने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

चेंबरचे माजी अध्यक्ष सीए कैलास जोगानी म्हणाले, एसएफटी फायलिंग आयकर नियम ११४ अंतर्गत विविध करदात्यांना आपल्या ग्राहकांच्या वित्तीय व्यवहाराचे विवरण आता मे महिन्याऐवजी ३० जून २०२१पर्यंत फाईल करता येणार आहे. याशिवाय जानेवारी-मार्चचे कर कपातीचे विवरण आयकर नियम ३१ ए अंतर्गत आता ३१ मेऐवजी ३० जूनपर्यंत फाईल करता येईल. तसेच टीडीएस सर्टिफिकेट फॉर्म नं. १६मध्ये अर्थात कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना १५ जूनपर्यंत द्यायचे असते, ते आता १५ जुलैपर्यंत देता येऊ शकेल. जोगानी म्हणाले, आयकर कलम १३९ (१) अंतर्गत वित्तीय वर्ष २०२०-२१चे आयकर विवरण ३१ जुलैपर्यंत भरायचे होते, ते आता ३० सप्टेंबरपर्यंत भरता येईल. याशिवाय वर्ष २०२०-२१चा आयकर ऑडिट रिपोर्ट, ट्रान्सफर प्रायझिंगचा सर्टिफाईल रिपोर्ट, आयकर विवरण भरण्याची तारीख वित्त मंत्रालयाने वाढवली आहे. तसेच रिव्हाईज रिटर्न आता ३१ डिसेंबरऐवजी ३१ जानेवारी २०२२पर्यंत भरता येणार आहे.

Web Title: Determined dates of income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.