"मतदान निश्चय शपथ" घेऊन केला मतदानाचा निर्धार; मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही
By गणेश हुड | Published: April 10, 2024 07:33 PM2024-04-10T19:33:00+5:302024-04-10T19:33:25+5:30
यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी उपस्थितांना "मतदान निश्चय शपथ" देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती घेवून इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले.
नागपूर : निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून, यात प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे, याची जाणीव करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन कार्यालयात बुधवारी कर्मचाऱ्यांनी "मतदान निश्चय शपथ" घेतली.
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, मिलींद मेश्राम, रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सा.प्र.वि.चे अधिक्षक श्याम कापसे, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, विजय बगले यांच्यासह मनपाचे सर्व महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी उपस्थितांना "मतदान निश्चय शपथ" देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती घेवून इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मतदान करीत इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करणार अशी ग्वाही यावेळी दिली.