देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार जाहीर; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 10:39 PM2023-06-10T22:39:10+5:302023-06-10T22:39:56+5:30
Nagpur News विश्व संवाद केंद्र (पूर्व विदर्भ विभाग) च्यावतीने देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान पुरस्कार-२०२३ ची घाेषणा करण्यात आली असून, छायाचित्रकाराच्या गटातून ‘लाेकमत’चे वृत्त छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूर : विश्व संवाद केंद्र (पूर्व विदर्भ विभाग) च्यावतीने देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान पुरस्कार-२०२३ ची घाेषणा करण्यात आली असून, छायाचित्रकाराच्या गटातून ‘लाेकमत’चे वृत्त छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वृत्तपत्र, दूरचित्रवाणी माध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरापर्सन यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारामध्ये साेशल मिडिया आणि सिटीझन जर्नलिस्टचाही समावेश करण्यात आला आहे. यंदा पुरस्काराचे १४ वे वर्ष असून, विशाल महाकाळकर यांच्याव्यतिरिक्त दृकश्राव्य माध्यमातून वृत्तवाहिनीचे पत्रकार रजत वशिष्ठ मुद्रित माध्यमातून संजय रामगिरीवार, साेशल मिडिया गटातून निखिल चंदवानी आणि सिटीझन जर्नलिस्ट म्हणून डाॅ. लखेश्वर चंद्रवेशी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १३ जूनला चिटणवीस सेंटर येथे दुपारी दोन वाजता हाेणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व राेख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.