आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 12:06 PM2023-06-13T12:06:34+5:302023-06-13T12:07:59+5:30

पत्रकार व वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत यांची उपस्थिती

Devarshi Narada Journalist Honor Award Distribution Today; Vishal Mahakalkar of 'Lokmat' along with four will be honoured | आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

आज देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार वितरण; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

googlenewsNext

नागपूर : विश्व संवाद केंद्राच्या वतीने ( पूर्व विदर्भ विभाग ) देण्यात येणाऱ्या देवर्षि नारद सन्मान पुरस्कार -२०२३ वितरण सोहळा आज (दि. १३ जून) दुपारी २ वाजता सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

देवर्षि नारद जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर हे उपस्थित राहणार असून मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रीय पातळीच्या पत्रकार व वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत यांची उपस्थिती राहील. पुरस्‍काराचे हे यंदाचे चौदावे वर्ष आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृत्तपत्र, दुरचित्रवाणी माध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार व कॅमेरापर्सन्सचा दरवर्षी सन्मान करण्यात येणार आहे.

देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार जाहीर; ‘लाेकमत’चे विशाल महाकाळकर यांच्यासह चौघांचा होणार सन्मान

त्‍यात संजय रामगिरीवार (दै. तरुण भारत, चंद्रपूर), रजत वशिष्ठ (एबीपी माझा, नागपूर), विशाल महाकाळकर (लोकमत, नागपूर), सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स निखिल चंदवानी, नागपूर व सिटीझन जर्नलिस्ट डॉ. लखेश्वर चंद्रवंशी (नागपूर) यांना देवर्षि नारद पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका रुबिका लियाकत यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व राेख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Web Title: Devarshi Narada Journalist Honor Award Distribution Today; Vishal Mahakalkar of 'Lokmat' along with four will be honoured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.