ग्रामीण भागात कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:28+5:302021-03-23T04:09:28+5:30
सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कुही/नरखेड/पारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी ९६७ कोरोनाबाधितांची नोंद झाली. रुग्णसंख्येची ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. सावनेर तालुक्यात ...
सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कुही/नरखेड/पारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी ९६७ कोरोनाबाधितांची नोंद झाली. रुग्णसंख्येची ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. सावनेर तालुक्यात संक्रमणाचा वेग अधिक आहे. येथे २३४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४५ तर ग्रामीण भागातील १८९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी ८०४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात चिचोली येथील प्राथमिक केंद्रात ६४, पाटणसावंगी (९८), केळवद (१), खापा (१८), बडेगाव (८) तर सावनेर येथे ४५ रुग्णांची नोंद करण्यात आली.
काटोल तालुक्यातील कोरोना साखळी अखंडित आहे. येथे ८१ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल शहरातील ३६ तर ग्रामीण भागातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरात धंतोली येथे सात, पंचवटी, आययुडीपी येथे प्रत्येकी चार, काळे चौक येथे तीन, गळपुरा, देशमुख ले-आऊट, कुणबीपुरा, पाॅवरहाऊस, पेठबुधवार येथे प्रत्येकी दोन तर राठी ले-आऊट, कडू ले-आऊट, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, तारबाजार, पांडे ले-आऊट, फल्ली मार्केट, साठेनगर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये मेंडकी येथे १२, कोंढाळी (११), हरणखुरी (४) तर गोंडीदिग्रस, वाढोणा, मसाळा येथे प्रत्येकी तीन तर इसापूर (खुर्द), गोंडीमोहगाव, घरतवाडा, लाडगाव, वंडली (वाघ), लाखोळी, जुनापाणी, मूर्ती, कळंबा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात २४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३४ तर शहरातील ५६ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात मोवाड येथे ६, सावरगाव (३), जलालखेडा (७) तर मेंढला केंद्रावर ५ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४३९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात वानाडोंगरी येथे ९, टाकळघाट (७), कान्होलीबारा व इसासनी येथे प्रत्येकी ५, हिंगणा व निलडोह येथे प्रत्येकी ४, डिगडोह व शिरुर येथे प्रत्येकी ३, वागदरा गुमगाव व गुमगाव येथे प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५,१६६ इतकी झाली आहे. यातील ४,१०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कुही तालुक्यात १३७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८८७ झाली आहे. यातील ७०३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १८४ रुग्ण स्वगृही विलगीकरणात आहेत.
उमरेड तालुक्यात ५० रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २४ तर ग्रामीण भागातील २६ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत १,६१९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात शहरातील ९४८ तर ग्रामीण भागातील ६७१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत १,२४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पारशिवनी नजीकच्या पारडी येथे २२ रुग्णांची नोंद झाली तर, एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. रामटेक तालुक्यात २० रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील टिळक वॉर्ड येथे ३, आंबेडकर वॉर्ड (२) व रामाळेश्वर वॉर्ड येथे एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात झीनजेरिया येथे ६, पंचाळा (३) तर हातोडी, काचूरवाही, शीतलवाडी, डोंगरताल, मनसर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १,४३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १,११३ कोरोनामुक्त झाले तर, ५१ रुग्णांचा मृत्यू झाला.
कळमेश्वर ग्रामीणमध्ये स्थिती चिंताजनक
कळमेश्वर तालुक्यात सोमवारी ९५ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा येथे (२३), तेलकामठी (१५), तेलगाव (६), गोंडखैरी (५), निमजी (४), तिष्टी बु. (४), कळंबी (२) तर भडांगी, सावळी, वरोडा, धापेवाडा खु, सेलू, पारडी देशमुख, तिडंगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.