तज्ज्ञांच्या सूचनांतून विकासाचा अजेंडा साकारा
By admin | Published: March 27, 2017 02:05 AM2017-03-27T02:05:44+5:302017-03-27T02:05:44+5:30
उपराजधानीला पुढील दहा वर्षात विकासाचे मॉडेल बनवायचे आहे. यासाठी नागरिकांच्या व तज्ज्ज्ञांच्या सूचनातून विकासाचा अजेंडा तयार करा, ....
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : सिटी डेव्हलपमेंट फोरमचे उद्घाटन
नागपूर : उपराजधानीला पुढील दहा वर्षात विकासाचे मॉडेल बनवायचे आहे. यासाठी नागरिकांच्या व तज्ज्ज्ञांच्या सूचनातून विकासाचा अजेंडा तयार करा, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले. नागपूर महापालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारा इक्विसिटी प्रकल्पांतर्गत हॉटेल सेंटर पॉईट येथे आयोजित सिटी डेव्हलपमेंट फोरमचे उद्घाटन व कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी, सिटी डेव्हलपमेंट फोरमचे संयोजक व माजी आमदार गिरीश गांधी, आयुक्त श्रावण हर्डीकर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे वरिष्ठ कार्यकारी संचालक रवि रंजन गुरु, व ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, विभागीय संचालक जयंत पाठक आदी उपस्थित होते.
नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रस्ते व पाणी अशा सर्वोत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी विकासाचा आराखडा व नियोजन करा. शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिका, नासुप्र, जिल्हा प्रशासन, मेट्रो रेल्वे, महानगर नियोजन प्राधिकरण अशा विविध संस्था आहेत. परंतु त्यांच्यात समन्वयाची गरज आहे. महापालिकेत नागरिक ांच्या समस्यांचे तातडीने निराकरण झाले पाहिजे. याची जबाबदारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आहे. २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली आहे.
५० टक्के पाणी कुठे जाते हे कुणालाच ठाऊ क नव्हते. परंतु आता परिस्थितीत सुधारणा झाली आहे. निविदा प्रक्रि या तातडीने पूर्ण करण्यासाठी करारनामा मॉडेल तयार करा, असे निर्देश गडकरी यांनी दिले.
युरोपियन युनियनने इक्विसिटी प्रकल्पासाठी नागपूर शहराची निवड केली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यत योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.
तज्ज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून नागपूर देशातील सर्वोत्तम स्मार्ट सिटी होईल, असा विश्वास नंदा जिचकार यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. नागपूर शहर इक्विसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाच मॉडेल होईल, असा विश्वास गिरीश गांधी यांनी व्यक्त केला.
विकासाच्या निर्णय प्रक्रि येत नागरिकांचा सहभाग असावा. सर्व नागरिकांना उत्तम सेवा उपलब्ध व्हाव्यात. याचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी फोरमची स्थापना करण्यात आल्याचे श्रावण हर्डीकर म्हणाले. यावेळी अशोक वानखेडे, रवि रंजन गुरु यांनीही मार्गदर्शन केले. उद्घाटन प्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
स्मार्ट सिटीतील सर्वोत्तम सुविधांचे ब्ल्यू प्रिंट सज्ज
उपराजधानी स्मार्ट व आरोग्यदायी शहर व्हावे, यासाठी समानतेच्या तत्त्वावर आधारित सर्व घटकांतील नागरिकांना सेवा उपलब्ध व्हाव्यात, याचे नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून भविष्यातील स्मार्ट सिटीतील सर्वोत्तम सुविधांची तत्त्वत: ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. शहरातील सर्व घटकांना समान नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सिटी डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली आहे. फोरमचे सदस्य व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सर्वोत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यावर चर्चा करून याचे ब्ल्यू प्रिंट तयार केले. यात सर्वांना समान नागरी सेवांची उपलब्धता, सहभागपूर्ण शासन व्यवस्था, सार्वजनिक वाहतुकीची समान सेवा व्यवस्था, सुरक्षितता व सुरक्षा व्यवस्था (महिला व बालके) शासन, महापालिकेचा अर्थसंकल्प -आर्थिक साहाय्य आदी बाबींवर सखोल चर्चा करून प्रभावी अंमलबजावणी अहवाल तयार करण्यात आला. यात भविष्यात आवश्यकता भासल्यास सुधारणा करण्यात येणार आहेत.
असा आहे सिटी डेव्हलपमेंट फोरम
सिटी डेव्हलमेंट फोरममध्ये संयोजक माजी आमदार गिरीश गांधी, राजीव थोरात, डॉ. नीलिमा देशमुख, डॉ. पी. शिवास्वरूप, संदीप शिरखेडकर, अप्रूप अडवडकर, कौस्तुभ चॅटर्जी, लीना बुधे, सुधीर फुलझेले, जी. एस. सैनी, सुनील सहस्रबुद्धे, अतुल झोटिंग यांचा तर अधिकाऱ्यांत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त जयंत दांडेगावकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, डॉ. प्रदीप दासरवार, डी.डी. जांभूळकर, महेश धामेचा, प्रकाश वराडे, मनोज तालेवार आदींचा समावेश आहे. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा यात समावेश केला जाणार आहे.
समान नागरी सेवांची उपलब्धता
शहरातील सर्व भागातील सर्वधर्मीयांना समानतेच्या आधारावर नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तांत्रिक यंत्रणा उभारणे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने नियोजन करून महापालिका अधिकाऱ्यांना त्यानुसार निर्देश देण्याची सूचना फोरमने केली.
सार्वजनिक वाहतुकीची समान सेवा व्यवस्था
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शाळा-महाविद्यालयाजवळ बसथांबे उभारणे, फूटपाथ पादचाऱ्यांना चालता येईल असे बनविण्यात यावे. शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यात यावी. मेट्रो रेल्वेला अनुसरून भविष्यात बसचे वेळापत्रक असावे, अशी सूचना फोरमने केली.
सुरक्षितता व सुरक्षा व्यवस्था
शहर विकास व निर्यय प्रक्रि येत महिलांचा सहभाग असावा. सुरक्षितता व सुरक्षा (महिला व बालके) सक्षम असावी. महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यात याव्यात. त्यांच्यासाठी मार्केटिंगची व्यवस्था उभारण्यात यावी. अर्थसंकल्पात महिला विकासासाठी निधीची तरतूद करण्याची सूचना करण्यात आली.
महापालिकेचा अर्थसंकल्प -आर्थिक साहाय्य
महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहे. प्राप्त उत्पन्नात महापालिकेचा वाटा २९ टक्के असून, शासकीय अनुदानाचा ७१ टक्के आहे. कराची वसुली १०० टक्के केली जात नाही. ६० ते ७० टक्के केली जाते. भविष्यात उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची सूचना फोरमने केली.