भेदभाव न करता विकास करा
By Admin | Published: March 5, 2016 03:18 AM2016-03-05T03:18:24+5:302016-03-05T03:18:24+5:30
भाजपने केलेल्या घोषणेनुसार गेल्या नऊ वर्षात शहर विकासाचा प्रयत्न केला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बंडू राऊ त
नागपूर : भाजपने केलेल्या घोषणेनुसार गेल्या नऊ वर्षात शहर विकासाचा प्रयत्न केला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बंडू राऊ त यांच्यासारख्या सामान्य व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. निवडणुकीपूर्वीचे हे स्थायी समितीचे वर्ष आहे. त्यामुळे पुढील दहा महिन्यात नगरसेवकात कोणताही भेदभाव न करता राऊत यांनी शहर विकासाला पुन्हा गती द्यावी,असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी केले.
महापालिका मुख्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात बंडू राऊ त यांनी मावळते अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्याकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. व्यासपीठावर उपमहापौर मुन्ना पोकुलवार, भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, चित्रपट अभिनेता विलास उजवणे, विषय समित्यांचे सभापती, पदाधिकारी उपस्थित होते.
राऊ त यांच्यात सर्वांचे समाधान करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षात निवडणूक असल्याने त्यांना दहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
या कालावधीत त्यांच्या नेतृत्वात समिती शहर विकासाची कामे करेल. नागपूर विकास आघाडीने शहर विकासाचे अनेक चांगले निर्णय घतले. २४ बाय ७ योजना, मालमत्ता कराची फेरआकारणी, या सोबतच विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहे. राऊ त यांच्या कार्यकाळातही विकासाची गती कायम राहील, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.
राऊ त सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले. त्यांना शहरातील समस्यांची जाण आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यांच्याकडे दहा महिन्यांचाच कालावधी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांना सोबत घेऊ न ते शहराचा विकास करतील अशी अपेक्षा दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त
स्यायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना राऊ त यांना दक्ष राहावे लागेल. महापालिकेतील अनेक घोटाळे गाजत आहे. गेल्या आठ-दहा वर्षात ज्या कंत्राटदारांनी योग्य काम केले नसेल, भ्रष्टाचाराचे आरोप असतील अशांना काळ्या यादीत टाकावे. ज्यांनी जादा पैसे उचलले असतील ते त्यांच्याकडून वसूल करावे. चांगल्या कामांना विरोधी पक्षांचा पाठिंबा राहील अशी ग्वाही विकास ठाकरे यांनी दिली.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही गेल्या वर्षभरात शहरात २८३ कोटींची विकास कामे केली. शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रमेश सिंगारे यांनी दिली. यावेळी विलास उजवणे यांनीही मार्गदर्शन करून राऊ त यांना शुभेच्छा दिल्या. सभापती संदीप जोशी, गोपाल बोहरे, गिरीश देशमुख, मुन्ना यादव, सुनील अग्रवाल, संदीप जाधव, देवेंंद्र मेहर, अॅड. संजय बालपांडे, राजू नागुलवार, गौतम पाटील यांच्यासह पदधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालक दिव्या घुरडे यांनी तर आभार रश्मी फडणवीस यांनी मानले. राऊ त यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)