विकास शुल्काचे पडसाद उमटणार

By admin | Published: January 6, 2015 12:59 AM2015-01-06T00:59:14+5:302015-01-06T00:59:14+5:30

हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका हद्दीत समावेश करताना या भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

Development charges will rise | विकास शुल्काचे पडसाद उमटणार

विकास शुल्काचे पडसाद उमटणार

Next

नागरिकांचा विरोध : हुडकेश्वर विकासाचे पॅकेज कुठे गेले?
नागपूर : हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका हद्दीत समावेश करताना या भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु मनपाने या भागात विकास शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. येथील नागरिकांत नाराजी असून याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
विकास शुल्काला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हुडके श्वर-नरसाळा भागात विकास शुल्क आकारण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहापुढे ठेवला जाणार आहे. सभागृहाची मंजुरी मिळताच वाढीव शुल्काची वसुली केली जाणार आहे.
नासुप्रच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रस्तावानुसार मनपाच्या नगररचना विभागाने हुडकेश्वर-नरसाळा भागात ८३.०५ प्रति चौ.फूट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार ७८.६५ रुपये विकास शुल्क तर ४.४० रुपये प्रति चौ.फूट दराने एसटीपी शुल्क आकारले जाणार आहे.
शुल्क वसुलीतून मनपाला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून या भागातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, सिवर लाईन अशी मूलभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Development charges will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.