रस्त्यांच्या जाळ्यामुळे देशाचा विकास : प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:23 AM2019-04-06T00:23:53+5:302019-04-06T00:25:03+5:30

केंद्रातील भाजपा नेतृत्वातील एनडीए सरकारच्या पाच वर्षांच्या काळात स्वच्छ भारत अभियान, अंत्योदय योजना, मेक इन इंडिया प्रधानमंत्री आवास योजना, विमा योजना अशा विविध विकास योजना राबविण्यात आल्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील सागरी मार्ग व रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाच्या विकासाला गती मिळाली, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले.

Development of the country due to road network: Pramod Sawant | रस्त्यांच्या जाळ्यामुळे देशाचा विकास : प्रमोद सावंत

रस्त्यांच्या जाळ्यामुळे देशाचा विकास : प्रमोद सावंत

googlenewsNext
ठळक मुद्देदेशाच्या विकासासाठी एनडीए सरकारची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रातील भाजपा नेतृत्वातील एनडीए सरकारच्या पाच वर्षांच्या काळात स्वच्छ भारत अभियान, अंत्योदय योजना, मेक इन इंडिया प्रधानमंत्री आवास योजना, विमा योजना अशा विविध विकास योजना राबविण्यात आल्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील सागरी मार्ग व रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने देशाच्या विकासाला गती मिळाली, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले. कुंभारटोली येथे आयोजित नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
प्रमोद सावंत म्हणाले, देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. म्हणून ते पंतप्रधान व्हावे, सोबतच देशासाठी नितीन गडकरी यांना कें द्रात पाठविणे गरजेचे आहे. गोवा राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध केला. गडकरी काहीही करू शकतात. त्यांच्यामुळे मी रात्री २ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निराधारांना निवारा मिळाला. शौचालय, अंत्योदय योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मोठा दिलासा दिला. मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. दहशतवादी हल्ल्याचा बदला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून घेतला. दुसरीकडे युपीए सरकारच्या काळात नुसते घोटाळे झाले. सबका साथ, सबका विकास यासाठी पुन्हा भाजपाच्या हातात देशाची सत्ता द्यावी, असे आवाहन सावंत यांनी केले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर, नगरसेविका मनिषा धावडे यांनीही मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, प्रमोद पेंडके, महेंद्र राऊ त, हितेश जोशी, चंदन गोस्वामी,नामदेव ठाकरे, जी.पी. शर्मा, नरेश चिटकाटे, दत्तु पारसकर, प्रमोद भोवते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी नगरसेवक हितेश जोशी यांनी केले.

Web Title: Development of the country due to road network: Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.