पाच खेळांच्या मैदानाचा हाेणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:52+5:302021-07-23T04:07:52+5:30

नीलेश देशपांडे नागपूर : नागपूरमधील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील किमान एक खेळाचे मैदान विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...

Development of five playgrounds | पाच खेळांच्या मैदानाचा हाेणार विकास

पाच खेळांच्या मैदानाचा हाेणार विकास

Next

नीलेश देशपांडे

नागपूर : नागपूरमधील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील किमान एक खेळाचे मैदान विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या भागात राहणाऱ्या खेळाडूंना त्यांचे काैशल्य विकसित करण्यासाठी मैदान मिळावे, या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरात पाच मैदाने विकसित केली जाणार आहेत.

मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमाेद तभाने यांनी सहा विधानसभा क्षेत्राची पाहणी करून पाच मैदानांची विकसित करण्यासाठी निवड केली आहे. यामध्ये पश्चिम नागपूरचे मरारटाेली फुटबाॅल मैदान, मध्य नागपूरचे आदर्श विणकर काॅलनी मैदान, दक्षिण नागपूरचे चाैकाेनी मैदान व युवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान, दक्षिण-पश्चिमचे सेन्ट्रल एक्साईज ले-आऊट मैदान आणि पूर्व नागपुरातून विदर्भ हाऊसिंग बाेर्ड काॅलनी मैदानाचा समावेश आहे. दरम्यान मनपा प्रशासनाने उत्तर नागपुरातून गुरू गाेविंदसिंह स्टेडियमची निवड केली हाेती. मात्र हे मैदान नासुप्रच्या अखत्यारित येत असल्याने मनपाने हे मैदान वगळले. त्याऐवजी दुसरा पर्याय शाेधण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

लाेकमतशी बाेलताना प्रमाेद तभाने यांनी या सर्व परिसरात वैयक्तिकरीत्या भेट दिल्याचे सांगितले. लवकरच आराखडा तयार करण्यासाठी अभियंत्याची नियुक्ती केली जाणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण प्रकल्पासाठी एक काेटीपेक्षा अधिक खर्च लागणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. मनपाकडे आवश्यक निधी असल्याचेही स्पष्ट केले. सर्व मैदाने समतल करणे, ग्रीन जिमची व्यवस्था उभारणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शाैचालयाचे बांधकाम करणे, सुरक्षा भिंत तयार करणे, फ्लडलाईटची व्यवस्था व नवीन गेट उभारण्यासारखी कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत महापाैर दयाशंकर तिवारी यांना विचारले असता, मनपा क्रीडा समितीने प्रकल्पाबाबतचे मूलभूत काम केले असून लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. मनपाकडे पुरेसा निधी असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण हाेईल, असा दावाही त्यांनी केला.

केवळ घाेषणा ठरू नये : गुडधे पाटील

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी प्रकल्पाबाबत मनपाच्या उद्देशावर संशय व्यक्त केला. मनपा सत्तापक्षाने अनेक घाेषणा केल्या आहेत पण प्रत्यक्ष अंमलबजावणी एकही झाल्याचे दिसत नाही. मनपाने मैदानाच्या विकासासाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे का, काेणती मैदान विकसित करणार आहेत, याबाबतही स्पष्ट केले नसल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Development of five playgrounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.