Video: फडणवीस-ठाकरेंची 'डिनर पे चर्चा', सभागृहातील तणावानंतर गप्पा अन् हास्यविनोद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 08:43 AM2022-12-23T08:43:51+5:302022-12-23T10:14:57+5:30
सभागृहात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे, एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवणारे नेते मंडळी लोकमतच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र गप्पागोष्टी करताना दिसून आले.
लोकमतच्या नागपूर आवृत्तीचा ५१ वा वर्धापनदिन तसेच लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष यांचे औचित्य साधून बुधवारी सायंकाळी यवतमाळ हाऊस स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, नागपूर अधिवेशनासाठी आलेले सर्वपक्षीय नेते आवर्जून हजर होते, त्यावेळी अनेक राजकीय विरोधक नेत्यांची एकत्रितपणे जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी, सभागृहात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारेही इथे एकाच टेबलावर बसल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गप्पा-टप्पा, हास्स मैफिल आणि जेवणाची पंगत कॅमेऱ्यात कैद झाली.
सभागृहात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे, एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवणारे नेते मंडळी लोकमतच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र गप्पागोष्टी करताना दिसून आले. यवतमाळ हाऊस येथील स्नेहमेळाव्या रात्रीच्या जेवणावेळी एकाच टेबलावर उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेतेमंडळी पाहायला मिळाली. यावेळी, खुर्ची या विषयावर चर्चा सुरू असताना फडणवीसांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले खुर्ची इंटरेस्टींग आहे, त्यावर फडणवीस लगेच उत्तरले... तेच म्हणतोय मी, बोर्डासहीतच बोलतोय. मग, आदित्य ठाकरेंनी पुन्हा त्यावर आपलं मत मांडलं. मग काय करू, बोर्ड त्याबाजुला घेऊ... तुम्ही या बाजुला या... असे म्हणत आदित्य यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, जेवणाच्या टेबलावर एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
नागपूरच्या यवतमाळ हाऊस येथे आयोजित स्नेहमिलन या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह सर्वपक्षीय दिग्गज राजकीय नेते हजर होते. या नेतेमंडळींची हसरी भावमुद्रा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हास्यविनोदात रमलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहीर, शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा. खालच्या छायाचित्रांमध्ये विजय दर्डा यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शेजारी डावीकडून आमदार प्रताप सरनाईक, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, एडिटर-इन-चीफ व राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन. बाजूच्या छायाचित्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत करताना विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, देवेंद्र दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी पाहायला मिळाले.