उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांची संघस्थानी हजेरी; भविष्यातील रणनीतीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 12:12 PM2022-08-29T12:12:13+5:302022-08-29T12:18:42+5:30

संघाच्या देवगिरी आणि विदर्भ प्रांताची बैठक, राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच एकत्रितपणे सरकार्यवाहांची भेट

devendra fadnavis chandrashekhar bawankule sudhir mungantiwar chandrakant patil Bjp-Rss Meeting in reshimbagh office Elections Discussion | उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांची संघस्थानी हजेरी; भविष्यातील रणनीतीवर चर्चा

उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांची संघस्थानी हजेरी; भविष्यातील रणनीतीवर चर्चा

googlenewsNext

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यवस्थेतील विदर्भ आणि देवगिरी प्रांताची समन्वय बैठक नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात पार पडली. या बैठकीला संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपतर्फे बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची भेट घेतली हे विशेष.

संघाच्या कार्यपद्धतीनुसार दरवर्षी क्षेत्रपातळीवरील समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते. यात संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित असतात. समन्वय बैठकीत आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आणि आगामी कार्याच्या नियोजनावर चर्चा झाली. सोबतच विविध संघटनांमध्ये समन्वय आणखी कसा वाढेल यावर यावेळी मंथन झाले. विविध संघटनांनी त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षादेखील यावेळी व्यक्त केल्या. यावेळी अखिल भारतीय सहसंघटन प्रमुख शिव प्रकाश देखील बैठकीला उपस्थित होते.

अखिल भारतीय समन्वय बैठकीची तयारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होते. यावर्षी ही बैठक १० ते १२ सप्टेंबर दरम्यान छत्तीसगडच्या रायपूर येथे होणार आहे. या बैठकीपूर्वी सरसंघचालक आणि सरकार्यवाह देशातील सर्व क्षेत्रांच्या बैठका घेतात. त्यापैकी निम्म्या बैठकी सरकार्यवाहांच्या उपस्थितीत होत असतात. त्यानुसार सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्राची समन्वय बैठक नागपुरात घेण्यात आली.

Web Title: devendra fadnavis chandrashekhar bawankule sudhir mungantiwar chandrakant patil Bjp-Rss Meeting in reshimbagh office Elections Discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.