Devendra Fadnavis, Gram Panchayat Election | देवेंद्र फडणवीसांना जिव्हारी लागणारा धक्का! 'त्या' गावात सलग दुसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:12 AM2022-12-21T00:12:38+5:302022-12-21T00:13:07+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला जोरदार यश पण...

Devendra Fadnavis faces setback in Gram Panchayat Elections 2022 as his adopted village Fetri has won by Congress NCP alliance Sarpanch | Devendra Fadnavis, Gram Panchayat Election | देवेंद्र फडणवीसांना जिव्हारी लागणारा धक्का! 'त्या' गावात सलग दुसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता

Devendra Fadnavis, Gram Panchayat Election | देवेंद्र फडणवीसांना जिव्हारी लागणारा धक्का! 'त्या' गावात सलग दुसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता

googlenewsNext

Devendra Fadnavis, Gram Panchayat Election: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळाले आणि भाजपा हाच राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. पण असे असले तरी विरोधकांनी फडणवीसांना जिव्हारी लागणारा एक पराभवाचा धक्का दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी गाव येथे सलग दुसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. लागोपाठ दोन वेळा भाजपाला धोबीपछाड देणाऱ्या आघाडीचे उमेदवार रवींद्र खांबलकर हे थेट सरपंच निवडणुकीत विजयी झाले.

फेटरी गावात एकूण नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीची रणधुमाळी होती. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत फेटरी विकास आघाडी पॅनलचे पाच सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. परंतु, मुख्य लढत ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे रवींद्र खांबलकर आणि भाजपाचे सुरेश लंगडे यांच्यात होती. रवींद्र खांबलकर यांना ६५७ तर भाजपाचे सुरेश लंगडे यांना ५९२ मते मिळाली. त्यामुळे खांबलकरांनी ६५ मतांनी लंगडे यांचा पराभव केला.

भाजपा पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्र. १ मधून तीन तर वार्ड क्र. २ मधून एक असे चार उमेदवार निवडून आले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वार्ड क्र. २ मधील दोन आणि वार्ड क्र. ३ मधील तिन्हीच्या तीनही असे एकूण पाच उमेदवार जिंकले. आशीष गणोरकर, ज्योती राऊत, हर्षा लंगडे, वकील डोंगरे, जितेंद्र पवार, वैशाली लंगडे, मुकेश ढोमणे, रेखा ढोणे, आणि मृणाली दोडेवार या नऊ उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. मृणाली दोडेवारांना ४२५, वकील डोंगरेंना २०८, ज्योती राऊतांना २३८, हर्षा लंगडेंना २२५, वैशाली लंगडेंना २२८, जितेंद्र पवारांना २१५, आशीष गणोरकरांना ३२४, मुकेश ढोमणेंना २८४ आणि रेखा ढोणेंना ३५१ मते मिळाली. मागच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या धनश्री ढोमणेंनी भाजपाच्या ज्योति राऊतांचा पराभव करत सरपंचपद मिळवले होते.

Web Title: Devendra Fadnavis faces setback in Gram Panchayat Elections 2022 as his adopted village Fetri has won by Congress NCP alliance Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.