विधान परिषदेतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 12:11 PM2021-12-14T12:11:50+5:302021-12-14T13:06:26+5:30

राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis reaction after chandrashekhar bawankule victory in vidhan parishad election 2021 | विधान परिषदेतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

विधान परिषदेतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

googlenewsNext

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. या विजयानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बावनकुळे यांना अश्रू अनावर झाले होते. 

मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे, असे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्रित येऊन सहज निवडणूक का जिंकू शकतात हे समज आम्ही मोडीत काढला आहे. राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले. पटोले हे पराभवाच्या अस्वस्थतेतून आरोप करत असल्याचा टोमणा फडणवीस यांनी यावेळी लगावला.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया 

वेळेवर उमेदवार बदलाचा फरक पडलेला नाही. भाजपने निवडणुकीत घोडेबाजार केला. त्यांच्याच मतदारांवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांना शहराबाहेर नेले. आपल्याच मतदारांवर विश्वास नसलेला हा पक्ष आहे. भाजपने लोकशाहीचा अपमान केला आहे. ही बसब लोकशाहीला घातक. भाजपच्या दाव्यावर भविष्यात उत्तर देऊ.

असा झाला विजय

भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली.

Web Title: devendra fadnavis reaction after chandrashekhar bawankule victory in vidhan parishad election 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.