भाविकांच्या कारला अपघात; दाेघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:17 PM2023-06-19T14:17:47+5:302023-06-19T14:28:38+5:30

भरधाव वाहनाची मागून धडक : काेंढाळी परिसरातील घटना

Devotee's car accident; Two died, three seriously injured | भाविकांच्या कारला अपघात; दाेघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

भाविकांच्या कारला अपघात; दाेघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

googlenewsNext

काेंढाळी (नागपूर) : वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने भाविकांच्या कारला मागून जाेरात धडक दिली. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार दुभाजकावर आदळली. या अपघातात कारमधील दाेघांचा मृत्यू झाला तर, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर महामार्गावरील काेंढाळी परिसरात रविवारी (दि. १८) पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

ब्रिजेश लखन गौन्नाडे (४७, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) व युवराज व्यंकट बेहेरे (५२, रा. गडचिरोली) अशी मृतांची नावे असून, गंभीर जखमींमध्ये सुनीता ब्रिजेश गौन्नाडे (४३, रा. राजनांदगाव, छत्तीसगड), चेतना युवराज बेहरे (४५) व कारचालक ऋषिकेश (२७) दाेघेही रा. गडचिरोली यांचा समावेश आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. गाैन्नाडे आणि बेहेरे कुटुंबीय झायलाे आणि कारने शिर्डी व शेगावला दर्शनासाठी गेले हाेते. दर्शन आटाेपल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले.

ते काेंढाळीपासून आठ किमी अंतरावर असताना महामार्गालगतच्या धाब्याजवळ त्यांच्या कारला (एमएच-३३/व्ही-३४२०) वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने मागून जाेरात धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित कार दुभाजकावर आदळली. यात कारमधील ब्रिजेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य चाैघे गंभीर जखमी झाले. पुढे युवराज यांचा उपचारदरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला.

धडक देताच वाहन नागपूरच्या दिशेने निघून गेले. माहिती मिळताच ठाणेदार पंकज वाघाडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. संजय गायकवाड यांनी चारही जखमींसह ब्रिजेश यांचा मृतदेह काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. डाॅ. आशिष तायवाडे यांनी जखमींवर प्रथमाेपचार केले. त्यानंतर त्यांना नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तर ब्रिजेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Devotee's car accident; Two died, three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.