समादेशक डहाणे, पीआय गांगुर्डेंसह ३३ कर्मचाऱ्यांना डीजी मेडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:56+5:302021-05-01T04:07:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रुप चारचे समादेशक पंकज डहाणे, पारडीचे ठाणेदार सुनील गांगुर्डे यांच्यासह जिल्ह्यातील ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रुप चारचे समादेशक पंकज डहाणे, पारडीचे ठाणेदार सुनील गांगुर्डे यांच्यासह जिल्ह्यातील ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवांकरिता डीजी मेडल जाहीर करण्यात आले. १ मेच्या पूर्वसंध्येला डीजीपी संजय पाण्डेय यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. राज्यातील ७९९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना डीजी मेडल जारी करण्यात आले आहेत.
शहर पोलिसांतील पीएसआय वैभव बारंगे, अब्दुल शकील शेख, तसेच ग्रुप १३ चे पीएसआय गुरुदेव खोब्रागडे यांना, तर एएसआय स्तरावर शहर पोलिसांतील विजय नेमाडे, शत्रुघ्न कडू, सुरेश वानखेडे, राजू पोतदार, अशोक भोयर, गजानन तांदूळकर, वसंत कनकदंडे, राजू कोठेकर, वसंता चौरे, महामार्गचे मंगलसिंग ठाकूर, ग्रामीण पोलिसांतील गोभीलाल शेंदरे व राजू मते यांचा या पदकासाठी नाव घोषित करण्यात आले आहे. या पदकासाठी हवालदार स्तरावर शहर पोलिसांतील प्रशांत देशमुख, दिव्यादेव मिश्रा, नंदू शास्त्रकार, गजानन मोरे, हरेंद्र गणवीर, मंगेश करडे, ग्रामीण पोलिसांतील विजय निकोसे, विलास वाट, अविनाश राऊत, ग्रुप चारचे लंकेश जोशी व किसन देवकाते यांचा समावेश आहे. यासोबतच शहर पोलिसांतील नायक शिपाई दिनेश यादव, भरत ठाकूर, वर्षा क्षीरसागर, विशेष कृती दलातील शिपाई गौतम बांबाळे व विवेक नरोटे यांना डीजी मेडल प्राप्त झाले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा प्रदान करताना भविष्यात आणखी उत्तम कार्य करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना संक्रमणामुळे राज्य स्थापना दिन व समारोह यंदा आयोजित होणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच डीजी मेडल प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.
..................