पुढील महिन्यात नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानांची पाहणी करणार डीजीसीए चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 09:30 PM2020-11-17T21:30:37+5:302020-11-17T21:32:05+5:30

Nagpur News Flying Club नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानाच्या इंजिनच्या पाहणीसाठी पुढील महिन्यात नागरी उड्डयन महासंचालनालयाची (डीजीसीए) चमू येणार आहे.

The DGCA team will inspect the Nagpur Flying Club aircraft next month | पुढील महिन्यात नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानांची पाहणी करणार डीजीसीए चमू

पुढील महिन्यात नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानांची पाहणी करणार डीजीसीए चमू

Next
ठळक मुद्देनागपूर फ्लाईंग क्लबची वेगळी ओळख

वसीम कुरैशी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कामात वेळेपेक्षा जास्त दुर्लक्ष केल्याने नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमानाच्या दुरुस्तीत साडेतीन वर्ष लागले. आता चारही विमान तयार झाले आहेत. या विमानात लागलेल्या नवीन इंजिनच्या पाहणीसाठी पुढील महिन्यात नागरी उड्डयन महासंचालनालयाची (डीजीसीए) चमू येणार आहे. त्यानंतरच क्लबला एफटीओ मान्यता मिळणार आहे.

सध्या क्लबचे संचालन करणारे व्यवस्थापन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. या कारणामुळे फ्लाईंग क्लबच्या विमानाचे संचालन यावर्षी होते वा नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पूर्वीच उशीर झाला आहे आणि पुढे एक वा दोन महिने पुन्हा लागल्यास त्यात आश्चर्य नाही.

नागपूर फ्लाईंग क्लबची उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात वेगळी ओळख आहे. पण क्लब लवकरच सुरू करण्यासाठी तत्परता दाखविण्यात आली नाही. विदर्भ एव्हिएशनची उपेक्षा करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये १७ जून २०१७ पासून उड्डाणे बंद आहे. एवढ्या लांब कालावधीमुळे विमानांचा एअरवर्दीनेस संपला आहे. एअरोक्लब ऑफ इंडियाकडून प्राप्त दोन विमानाची लीज संपली आहे. क्लबच्या परवान्याच्या स्वरूपात फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची (एफटीओ) मान्यता गेली आहे. अनेक वर्षे लोटली, पण व्यवस्थापनाने क्लबच्या उड्डाणाकरिता आवश्यक पद सीएफआयची नियुक्ती अजूनही केलेली नाही. क्लबच्या सुरळीत संचालनासाठी उशीरच झाला आहे. आता कुठे विमान दुरुस्त झाली आहेत. फ्लाईंग क्लबच्या सध्याच्या स्थितीसंदर्भात प्रभारी एमडी साळवे यांच्याशी संपर्क साधला, पण ते निवडणूक कार्यात व्यस्त असल्याने कार्यालयात भेटू शकले नाही.

चार पदांसाठी काढण्यात येणार जाहिरात

सूत्रांच्या माहितीनुसार डीजीसीएच्या पाहणीनंतर क्लबतर्फे सीएफआय (चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर), एफआय (असिस्टंट फ्लाईंग इन्स्ट्रक्टर) आणि दोन पदांसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. सध्या केवळ एवढीच पदे रिक्त आहेत वा त्यापेक्षा जास्त, यावर क्लबच्या व्यवस्थापनाच्या चुप्पीने सध्या स्पष्ट झाले नाही. दुसरीकडे एका विमानाची दुरुस्ती अजूनही पूर्ण झालेली नाही, यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात फ्लाईंग क्लबचे संचालन थांबविण्यासाठी त्रुटी जाणीवपूर्वक सोडण्यात येत आहेत.

Web Title: The DGCA team will inspect the Nagpur Flying Club aircraft next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर