तिबेटच्या मुक्तीसाठी धम्म पदयात्रा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:52 PM2018-08-22T20:52:21+5:302018-08-22T20:53:54+5:30
तिबेटच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते धर्मशाला अशा दोन हजार किमीचा पायी प्रवास करणारे भंते रेवत यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तसेच बुद्धमूर्तीला अभिवादन करून पुढच्या प्रवासाला सुुरुवात केली. यावेळी तिबेटियन नागरिकांच्यावतीने भंते रेवत यांचे पारंपरिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिबेटच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते धर्मशाला अशा दोन हजार किमीचा पायी प्रवास करणारे भंते रेवत यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तसेच बुद्धमूर्तीला अभिवादन करून पुढच्या प्रवासाला सुुरुवात केली. यावेळी तिबेटियन नागरिकांच्यावतीने भंते रेवत यांचे पारंपरिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रिजनल तिबेटियन युथ काँग्रेसचे (गोठणगाव) संयोजक भंते लामा लोंबसांग टेम्बा, कॅलसँग, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे, सुनील सारिपुत्त, भंते अभय नायक, संदेश मेश्राम, शंकर माणके, कांचन वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
भंते रेवत यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवरून धम्मपदयत्रेला सुरुवात केली. हिमाचल प्रदेशतील धर्मशालापर्यंत ते पायी प्रवास करणार आहेत. नागपुरात दाखल झाल्यावर त्यांनी अनेक स्थळांना भेटी दिल्या. तसेच भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर यांच्यासह अनेकांशी चर्चाही केली. आपल्या प्रवासात ते अशाच पद्धतीने विविध ठिकाणच्या बौद्ध स्थळांना भेटी देत मन्यवरांशी चर्चा करतील. काही ठिकाणी परिसंवाद आयोजित करून तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृती करतील. नागपूरवरून ते भोपाळ, आगरा, दिल्ली, अमृतसर मार्गे हिमाचल प्रदेशातील धर्मशालात पोहोचतील.
आम्ही सुखात पण तिबेटियन दु:खी
चीनने तिबेटवर अतिक्रमण केले. आम्ही भारतात आलो. भारताने आम्हाला केवळ आसराच दिला नाही तर भरपूर प्रेमही दिले. आम्ही तिबेटियन भारतात अतिशय सुखी आहोत. परंतु तिबेटमध्ये राहणारे आमचे बांधव मात्र दु:खी जीवन जगत आहेत. आम्ही सर्व तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. भंते रेवत यांनी पुढाकार घेत तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी पदयात्रा काढली, त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू.
भंते लामा लोबसांग
संयोजक, रिजनल , तिबेटियन यूथ काँग्रेस (गोठणगाव)