दीक्षाभूमीवर धम्मशक्तीचे विराट दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:27 AM2017-08-14T01:27:35+5:302017-08-14T01:28:17+5:30

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांती आणि सद्भावनासह एकतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली काढण्यात आली.

Dhamashakti's Virat Darshan on Dikshitabhoomi | दीक्षाभूमीवर धम्मशक्तीचे विराट दर्शन

दीक्षाभूमीवर धम्मशक्तीचे विराट दर्शन

Next
ठळक मुद्देधम्मरॅलीच्या समारोपाला हजारोंची उपस्थिती : महिनाभरात रुजवला एकतेचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांती आणि सद्भावनासह एकतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली काढण्यात आली. महिनाभर शेकडो किलोमीटर पायी फिरून शहरातील तब्बल ४०० विहारांना भेट देत प्रत्येक वस्त्यांमध्ये धम्मसंदेश पोहोचवण्यात आला. रविवारी या धम्मरॅलीचा दीक्षाभूमीवर समारोप झाला. या समारोपालाही हजारो धम्मबांधवांनी सहभागी होऊन धम्मशक्तीचे विराट दर्शन घडविले.
अनाथपिंडक परिवारतर्फे मागील तीन वर्षांपासून ही धम्मरॅली काढण्यात येते. भदंत ज्ञानबोधी आणि पी.एस. खोब्रागडे (श्रमण पय्याधम्मा) यांच्या नेतृत्वात २०० श्रमण भिक्खू या धम्मरॅलीत सहभागी झाले होते. दररोज किमान १५ ते २० किमी पायी चालून शहरातील ४०० विहारांना भेटी देण्यात आल्या. शहरात शांती व सद्भाव कायम राहावा, यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न या धम्मरॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. रविवारी सकाळी ११ वाजता भीम चौक जरीपटका येथून धम्मरॅलीला सुरुवात झाली.
इंदोरा चौक, गड्डीगोदाम, एलआयसी, संविधान चौक मार्गे ही धम्मरॅली दीक्षाभूमीवर पोहोचली. श्रमण गौतम पाटील, अमन कांबळे, साहेबराव सिरसाट, सागर डबरासे, प्रीतम बुलकुंडे, राजू झोडापे, शिशुपाल कोल्हटकर आदी उपस्थित होते. प्रफ्फुल भालेराव, प्रफ्फुल मानके, महेंद्र कांबळे, असलम खान मुल्ला, महेश सहारे, पंकज लोणारे, विवेक निकोसे, संतोष खडसे, किशोर उके, संदीप मेंढे, किशोर कैथेल, विलास देशभ्रतार, योगेश लांजेवार, पृथ्वी शेंडे, राष्ट्रपाल पाटील, उषा मेश्राम आदींसह विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकाºयांसह हजारो धम्मबांधव सहभागी झाले होते.

रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत
जरीपटका येथून निघालेल्या या समारोपीय धम्मरॅलीचे रस्त्यात ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. तरुण-तरुणींनी रस्ता झाडून आणि रस्त्यांवर पाकळ्या टाकून भिक्खू संघाचे स्वागत केले.

Web Title: Dhamashakti's Virat Darshan on Dikshitabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.