धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर मुख्य सोहळा गुरुवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:59 PM2018-10-17T21:59:05+5:302018-10-17T21:59:56+5:30
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वरा, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले प्रामुख्याने उपस्थित राहतील.