धनगर पुन्हा उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:00 PM2019-01-28T13:00:28+5:302019-01-28T13:00:58+5:30

सरकारवर दबाव वाढविण्यासाठी धनगर पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पत्रपरिषदेत दिला.

Dhangar will be on the road again | धनगर पुन्हा उतरणार रस्त्यावर

धनगर पुन्हा उतरणार रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे निर्णय घेण्यास खूप उशीर झाला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले, सवर्णांना आरक्षण दिले, पण धनगरांची ७० वर्षे जुनी मागणी आहे. सरकारने आश्वासन दिले आहे, मात्र निर्णय घेतला नाही, त्यामुळे सरकारवर दबाव वाढविण्यासाठी धनगर पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पत्रपरिषदेत दिला.
भाजपाने सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगराचा प्रश्न निकाली काढण्याचे वचन दिले होेते. सरकार धनगरांना आरक्षण देईल, यावर विश्वास आहे. पण खूप उशीर होत आहे. त्यामुळे धनगर समाजात राग, रोष, असंतोष पसरत आहे. त्यामुळे पुन्हा एका सरकारवर दबाव वाढविण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीपासून धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. निवडणुका लागण्यापूर्वी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेऊन, हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी महात्मे यांनी केली. आंदोलन करूनही सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास पदाचा राजीनामा देणार का, यावर महात्मे म्हणाले की, राजीनाम्याने धनगरांचा प्रश्न सुटत असेल तर मला आनंद होईल. पण ७० वर्षामध्ये धनगर समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडता येत आहे. विदर्भातील शेळ्या मेंढ्या विमानाद्वारे आखाती देशात निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. परंतु काही संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा प्रकल्प बंद पडला. मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल, असे महात्मे म्हणाले.

Web Title: Dhangar will be on the road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.