धनगर समाजाचे उपोषण आंदोलन
By admin | Published: August 4, 2014 12:52 AM2014-08-04T00:52:51+5:302014-08-04T00:52:51+5:30
घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्या, यासाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे.
नागपूर : घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्या, यासाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाजबांधव टप्प्याटप्प्याने या आंदोलनात सहभागी होत आहे. शनिवारी २० जणांनी यात सहभाग घेतला.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला आहे. परंतु त्यानुसार या समाजाला कोणत्याही सवलती मिळत नाही. सवलती लागू करण्यासाठी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल महात्मे यांच्या नेतृत्वात वेळोवळी आंदोलन करण्यात आले. परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे मागण्यासाठी समितीने आंदोलन तीव्र केले आहे.
समाजाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आंदोलनाला सर्वक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे. परंतु आदिवासी नेत्यांच्या दडपणामुळे राज्य सरकार मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करीत आहे.
साखळी उपोषणाने प्रश्न मार्गी लागला नाही तर बेमुदत उपोषणा करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
उपोषण आंदोलनात दिलीप डाखोडे, अरुण माहुरे, विशाल तांबडे, प्रकाश वारे, कैलास वारे, अजय बुधे, छाया पुरडकर, देवेंद्र बुधे, सुरेखा काउटकार यांच्यासह २० जणांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)