हे बसस्थानक आहे की दारुड्यांचा अड्डा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 03:46 PM2021-12-01T15:46:10+5:302021-12-01T15:59:57+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद आहे नेमका याचाच फायदा घेत स्थानिक व परिसरातील दारुड्यांसह इतर असामाजिक तत्त्वांनी धापेवाडा येथील बसस्थानकात त्यांचा अड्डा तयार केला आहे.
विजय नागपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यंतरी कोरोना संक्रमणामुळे तर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद आहे नेमका याचाच फायदा घेत स्थानिक व परिसरातील दारुड्यांसह इतर असामाजिक तत्त्वांनी धापेवाडा (ता. कळमेश्वर येथील बसस्थानकात त्यांचा अड्डा तयार केला आहे. या गंभीर प्रकाराकडे राज्य परिवहन व पोलीस विभागाने दुर्लक्ष केले आहे.
विठ्ठल-रुख्मिणी मंदिरामुळे धापेवाड्याला विदर्भात तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशी व कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. शिवाय, येथे वर्षभर भाविकांचा राबता असतो. येथील गोडकळीस आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीचे काही दिवसापूर्वी नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे प्रवाशासह भाविकांचा थोडा दिलासा मिळाला होता. मात्र अल्पावधीतच या बसस्थानक व परिसराची अवस्था दयनीय झाली आहे.
आधी कोरोना संक्रमणामुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. मध्यंतरी ती सुरू करण्यात आली. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ही प्रवासी वाहतूक पुन्हा बंद झाली. त्यामुळे या बसस्थानकात प्रवाशांची फारशी वर्दळ राहिली नाही. नेमका याचाच फायदा घेत दारुडे व असामाजिक तत्वांच्या लोकांनी या ठिकाणी त्यांचा ठिय्या मांडायला सुरुवात केली. कुणीही प्रतिबंध करीत नसल्याने त्यांचे हे हक्काचे ठिकाण बनले आहे.
गुरांसह विषारी प्राण्यांचा वावर
बसस्थानकाचा परिसर निर्जन राहत असल्याने या ठिकाणी मोकाट जनावरे आणि डुकरांचा वावर वाढला आहे. गवत व झुडपांमुळे वास्तव्याला अनुकूल जागा मिळाल्याने या ठिकाणी विषारी साप व इतर सरपटणाऱ्या प्राणी किटकांचाही वावर वाढला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांच्या जीवितास संपामुळे धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.
कचरा व झुडपांचे साम्राज्य
या बसस्थानकाच्या आवारातील वर्दळ कमी झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चला आहे. शिवाय, गवत व सुपेली आहेत. जनावरे आणि येथील कचरा वाण सर्वत पसरत आहे. या ठिकाणी दारुच्या फेकत असल्याने बाटल्या काचाही ठिकठिकाणी दिसून येतात