धर्मचक्र प्रवर्तन दिन; बौद्ध पद्धतीचा तो पहिला विवाह ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:11 AM2018-10-17T10:11:33+5:302018-10-17T10:13:29+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला.

Dharmachakra Enforcement Day; It was the first marriage of Buddhist method | धर्मचक्र प्रवर्तन दिन; बौद्ध पद्धतीचा तो पहिला विवाह ठरला

धर्मचक्र प्रवर्तन दिन; बौद्ध पद्धतीचा तो पहिला विवाह ठरला

googlenewsNext
ठळक मुद्देधम्मदीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी झाला सोहळामहास्थवीर चंद्रमणी यांनी लावले लग्न

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या परिवर्तनामुळेच अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले गेले. याच जोरावर १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला. महास्थवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अगदी साध्या पद्धतीने पहिला बौद्ध विवाह लावला, आणि शतकानुशतके बुरसटलेल्या चालीरीती, प्रथांना तिलांजली दिली. कुही तालुक्यातील वामनराव मोटघरे व लष्करीबाग येथील दमयंती रामटेके या नवदाम्पत्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली.
जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर एक नवी चेतना निर्माण झाली. जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसात भेद करतो, त्या धर्माच्या चालीरीतीने विवाह करायचा नाही असे ठरले. यासाठी आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेले नामदेवराव नागदेवते, पुंडलिक गौरखेडे, श्रीराम रामटेके यांनी वामनराव मोटघरे व दमयंती रामटेके यांचा विवाह बौद्ध पद्धतीने करण्यासाठी पुढाकार घेतला. विवाहाची तारीखही जाणीवपूर्वक निवडण्यात आली. पहिल्यांदाच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायचित्र असलेल्या पत्रिका वाटण्यात आल्या. बाबासाहेबांनी या विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे यासाठी नागदेवते, गौरखेडे, रामटेके हे १३ आॅक्टोबर रोजी बर्डीच्या श्याम हॉटेलकडे निघाले. परंतु त्यांना बाहेरच थांबविण्यात आले. बºयाच प्रयत्नानंतर ते माईसाहेब आंबेडकरांना भेटू शकले. परंतु बाबासाहेबांची प्रकृती बरोबर नसल्याचा निरोप मिळाल्यावर ते माघारी फिरले. या विवाह सोहळ्यासाठी महास्थवीर चंद्रमणी यांनी होकार दिला होता. १४ आॅक्टोबरला या दोन्ही कुटुंबीयांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. विवाहाचा दिवस १५ आॅक्टोबर आला. वधू-वर पांढरे शुभ्र वस्त्र घालून उभे होते. महास्थवीर चंद्रमणी यांनी या उभय वर-वधूला समोरासमोर उभे केले. त्रिशरण-पंचशील घेतले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नविधी पार पडला. या मंगल परिणयाला ४० हजाराहून लोक उपस्थित होते. आज हे दाम्पत्य नाही. त्यांचा मुलगा राजरतन मोटघरे हा विवाह सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देत जिवंत करून सांगतात.

बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणला विवाह
प्रा. एन. एम. कांबळे आणि इंदुमती सदाशिवराव बंदीसोडे यांच्या विवाहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला होता. बाबासाहेबांनी विवाह समारंभासाठी स्वत: पाली गाथा लिहून दिल्या. १३ मे १९५६ रोजी हा मंगलसोहळा पार पाडला. बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणलेला भारतातील तो पहिलाच विवाह होता.

Web Title: Dharmachakra Enforcement Day; It was the first marriage of Buddhist method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.