धर्मरावबाबा आत्राम म्हणतात, आम्ही ४० आहोत, लवकरच ५० होऊ !
By कमलेश वानखेडे | Updated: July 6, 2023 18:08 IST2023-07-06T18:07:46+5:302023-07-06T18:08:53+5:30
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झालेले धर्मरावबाब आत्राम यांनी अजित पवार यांच्यासोबत सध्या ४० आमदार असून लवकरच ही संख्या ५० वर जाणार असल्याचा दावा केला.

धर्मरावबाबा आत्राम म्हणतात, आम्ही ४० आहोत, लवकरच ५० होऊ !
कमलेश वानखेडे
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झालेले धर्मरावबाब आत्राम यांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. यावेळी आत्राम यांनी अजित पवार यांच्यासोबत सध्या ४० आमदार असून लवकरच ही संख्या ५० वर जाणार असल्याचा दावा केला.
विमानतळावर समर्थकांनी आत्राम यांचे स्वागत केले. यावेळी आत्राम म्हणाले, मी चारदा निवडून आलो व चारदा मंत्री झालो. राजकीय घडामोडी होत असतात. तशीच यावेळीही झाली. आपण राष्ट्रवादीचेच आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची निवड झाली आहे. ते आमचे अध्यक्ष आहेत. खातेवाटप होईल तेव्हा होईल, पण मी साहेबांच्या आशिर्वादाने मंत्री झालो. गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद दिले. विदर्भ मागासला आहे. मंत्रीपदाचा वापर विकासासाठी करण्याचा प्रयत्न करू. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचोरीलाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.