गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:23 AM2017-11-01T01:23:45+5:302017-11-01T01:24:01+5:30
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणावर धडक मोर्चा काढला. धरणाचे पाणी, प्रकल्पग्रस्तांना मोबदला व रोजगाराची मागणी करीत विलास भोंगाडे यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणावर धडक मोर्चा काढला. धरणाचे पाणी, प्रकल्पग्रस्तांना मोबदला व रोजगाराची मागणी करीत विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात मोर्चेकºयांनी प्रकल्पाकडे जाणारा मार्ग अडवला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत डाव्या कालव्यावर जनसभा घेण्यात आली.
धरणाजवळच्या गावांना धरणाचे पाणी मिळावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची २० टक्के रक्कम त्वरित मिळावी, प्रकल्पग्रस्तांचे सुविधा देऊन पुनर्वसन करण्यात यावे, मासेमार प्रकल्पग्रस्तांना मासेमारीचा कायदेशीर अधिकार, ६८ गावठाण करण्यासाठी शेती देणाºया शेतकºयांना २०१३ चे पॅकेज, रोजगार आणि धरणातील बनशिंगाड्याच्या वेली काढण्यात यावे, आदी मागण्या करीत सोमवारी शेकडोच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला.
गोसेखुर्द चौकापासून निघालेला मोर्चा डाव्या कालव्यावर थांबविण्यात आला. नियंत्रणासाठी अड्याळ पोलीस स्टेशनचे ठानेदार ताफ्यासह कालव्यावर पोहचले होते. आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी सभा घेण्यात आली.
यावेळी विलास भोंगाडे, वामन भोयर, सीताराम रेहपाडे, प्रवीण मेश्राम, समिश्रा गणवीर, धर्मराज गणवीर आदींनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झाडे व अन्वेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी तासभर चर्चा केली. २०१८ पर्यंत गोसे बुजरुक, गोसेखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा, पाथरी आदी गावांच्या शेताला पाणी देण्यासह पुनर्वसनाची कामे व नागरी सुविधांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
त्यानंतर पोलीस निरीक्षकांना मागण्याचे निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्च्यामध्ये भीमराव भिमटे, रमेश भेंडारकर, जागो सूर्यवंशी, दादा आगरे, शिवशंकर माटे, गुलाब मेश्राम आदींचा सहभाग होता.