डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:27+5:302021-05-07T04:08:27+5:30
- वाणिज्य बातमी ... ८ बाय २ .. फोटो आहे... नागपूर : पंचशील चौक, टिळक पत्रकार भवनासमोर, धंतोली येथील ...
- वाणिज्य बातमी ... ८ बाय २ .. फोटो आहे...
नागपूर : पंचशील चौक, टिळक पत्रकार भवनासमोर, धंतोली येथील डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये विप्रो जीई कंपनीची भारतीय उत्पादन असलेली ३२ स्लाईस एसीटी एक्स्पर्ट एडिशन मशीन २४ तास सेवेत उपलब्ध आहे. अत्यंत सुसज्ज व कोरोनाविषयी सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन हे सेंटर आज नागपुरात सेवा देत आहे. कोरोनाकरिता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार एचआरसीटी स्कॅन येथे अल्प दरात केले जात आहे. डायग्नोपिन ही कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट यांची सहयोगी संस्था आहे. कोरोना रोगाचे निदान हे आरटी-पीसीआर चाचणीद्वारे होते. ही चाचणी तोंडातून व नाकातून स्वॅब नमुने घेऊन केली जाते. या चाचणीचा निकाल येण्यास साधारणत: २४ ते ४८ तास लागतात. तोपर्यंत हे रुग्ण इतर लोकांत मिसळत असल्याने या रोगाचा संसर्ग वाढत चालला आहे. आरटी-पीसीआरबरोबरच सीटी स्कॅनद्वारे शरीरात छातीमध्ये किती प्रमाणात विषाणू संक्रमित झाला आहे, याचे निदान त्वरित होते. नवीन विकसित असलेल्या सीटी स्कॅनची यंत्रणा ही अत्यंत कमी रेडिएशनवर स्कॅन करते. त्यामुळे भविष्यात रेडिएशनमुळे होणारे धोके होण्याची शक्यता कमी असते. परंतु सध्याच्या काळात विप्रो जीई कंपनीने कमी रेडिएशनवर स्कॅन करणारी नवीन सीटी स्कॅन यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे सीटी स्कॅन हा अत्यंत कमी रेडिएशनद्वारे केला जातो. कोरोनाचे लक्षणे आढळल्यास सीटी स्कॅन केल्यामुळे छातीत किती प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे हे सीटी स्कॅनच्या सीटी स्कोअरवरून ताबडतोब कळते व सिटी स्कोअरच्या अनुषंगाने डॉक्टरांना उपचारासंबंधीत निर्णय घेण्यास मदत होते, अशी माहिती इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे सीनिअर कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉ. विकास ओझा यांनी दिली. (वा.प्र.)