पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:01 AM2019-08-10T10:01:11+5:302019-08-10T10:01:43+5:30

पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

Did Pakistan occupied Kashmir donate to Pakistan? | पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

Next
ठळक मुद्दे नियंत्रण रेषेबाबत खुलासा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी विधानसभेच्या जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. त्या आधारावरच पाकव्याप्त काश्मीरवर आपण दावा करीत होतो. केंद्र्र सरकारने कलम ३७० रद्द करून पाकव्याप्त काश्मीरचे भारताशी असलेले संबंध तोडले आहेत. यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा संबंध संपला आहे. ज्या जागेसाठी लाखो सैनिक शहीद झाले, त्या पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, असा सवाल करीत याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, हे कलम रद्द केल्याने आसाम, नागालँड, मिझोरम, मेघालयसह अनेक राज्यांना देण्यात आलेला विशेष दर्जाही आपोआप संपुष्टात येईल. मराठवाडा, विदर्भाला देण्यात आलेला विशेष दर्जाही जाईल. पत्रपरिषदेला आ. बळीराम शिरस्कर, वंचित बहुजन आघाडी विदर्भ प्रमुख राजेंद्र महाडोळे, माजी राज्यमंत्री रमेश गजभिये, माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, संजय हेडाऊ , सागर डबरासे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शहराध्यक्ष रवि शेंडे उपस्थित होते.
पूरग्रस्तांना शासनाची अजूनही मदत नाही
सरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पैसा आहे. परंतु, पूरग्रस्तांसाठी नाही, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गेल्या पाच, सात दिवसांपासून पाण्याखाली असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. मंत्री, खासदार दौरे करीत आहेत. परंतु पूरग्रस्तांना मदत मात्र मिळालेली नाही. जी काही मदत होत आहे ती केवळ सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
धरणांसाठी नियोजन समिती असावी
कर्नाटकमधील आलमट्टी धरणाचे दरवाजे बंद असल्याने नदीचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. हे पूर्णपणे भरल्यास सांगली शहर वर्षभर पाण्याखाली राहील. कृष्णा, आलमट्टी व इतर धरणांच्या नियोजनांसदर्भात एक समिती गठित करण्याची मागणीसुद्धा अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केली.
२८८ जागा लढण्याची तयारी
काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नाही. चर्चा झाल्यास जागांबाबत ठरवू. आमची सर्व २८८ जागा लढण्याची तयारी आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

Web Title: Did Pakistan occupied Kashmir donate to Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.