‘आपली बस’मध्ये डिझेल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:44 AM2017-08-04T01:44:05+5:302017-08-04T01:44:54+5:30
महापालिकेच्या आपली बस सेवेच्या ताफ्यातील हंसा ट्रॅव्हल्सच्या एमएच ३१ -सीए-६१८४ क्रमांकाच्या बर्डी ते गिडोबा नगर शहर बसने गुरु वारी दुपारी फेरी पूर्ण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बस सेवेच्या ताफ्यातील हंसा ट्रॅव्हल्सच्या एमएच ३१ -सीए-६१८४ क्रमांकाच्या बर्डी ते गिडोबा नगर शहर बसने गुरु वारी दुपारी फेरी पूर्ण केली. त्यानंतर बस उभी असताना बसच्या डिझेल टँकमधून पाईपव्दारे डिझेलची चोरी करताना चालकाला रंगेहात पकडण्यात आले. परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे व परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी स्टींग करून चालकाला रंगेहात पकडले.
गिडोबानगर येथे बस उभी केल्यानंतर बसच्या डिझेल टँकमधून डिझेल काढून विकले जात असल्याची माहिती कुकडे यांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसापासून येथे पाळत ठेवण्यात आली होती. मिळालेली माहिती खरी असल्याने गुुरुवारी बंटी कुकडे यांनी बसचा चालक सचिन गेचोटे याला टँकमधून डिझेल काढताना रंगेहात पकडले.
या संदर्भात नंदनवन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिनने टँकमधून काढलेले दहा लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. चोरीचे डिझेल विकत घेण्याºयालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वीही चोरीचे डिझेल विकत घेतल्याची माहिती त्याने दिल्याचे कुकडे यांनी सांगितले. महापालिकेच्या बसमधून डिझेलची चोरी होत असल्याच्या यापूर्वीही घटना घडलेल्या आहेत. परंतु डिझेलची चोरी करताना रंगेहात पकडण्यात यश मिळत नव्हते. डिझेल चोरी करणारे रॅकेट असण्याची शक्यता आहे. यादृष्टीने माहिती घेणार असल्याचे कुक डे यांनी सांगितले.
१२ महिला कंडक्टर निलंबित
महापालिके च्या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर वसुली करीत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत प्रवाशांनाीही व्हीडिओ पाठविलेले आहेत. अशा प्रकरणांची शहानिशा करून आजवर १२ महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. पुन्हा एक प्रकार उघडकीस आला आहे. यात दोषी आढळल्यास महिला कंडक्टरला निलंबित करणार असल्याची माहिती कुकडे यांनी दिली.