टाेल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:10 AM2021-02-17T04:10:34+5:302021-02-17T04:10:34+5:30

लोकमत एक्सक्लूसिव वसीम कुरैशी नागपूर : १५ फेब्रुवारीपासून टाेल नाक्यांवर इलेक्ट्रानिक्स टाेल वसुली बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र काही ...

Difficulty getting fastag scans on tail noses () | टाेल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी ()

टाेल नाक्यांवर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी ()

Next

लोकमत एक्सक्लूसिव

वसीम कुरैशी

नागपूर : १५ फेब्रुवारीपासून टाेल नाक्यांवर इलेक्ट्रानिक्स टाेल वसुली बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र काही टाेल नाक्यांवर बॅलेन्स असूनही फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नाक्यांवरील कर्मचारी वाहनचालकांवर दुप्पट टाेल आकारत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे वाहनचालकांची फसल्यागत अवस्था हाेत आहे.

असाच एक प्रकार वर्धा राेडवरील हळदगाव टाेल नाक्यावर दुपारी ३.२८ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आला. येथे एमएच-३१, सीक्यू ३४५० क्रमांकाचा एक टॅंकर फास्टॅगच्या लेनमध्ये लागला पण नाक्यावर लागलेल्या स्कॅनरमध्ये त्या टॅंकरचे कार्ड स्कॅनच झाले नाही. टॅंकर मालक व ट्रान्सपाेर्टर अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी टाेल नाक्यावरील कर्मचाऱ्याने संबंधित बॅंकेचे फास्टॅग कार्ड चालत नसल्याचे सांगितले. वाहनाचे पेपर जप्त करण्याची धमकी सुद्धा दिली. एवढेच नाही तर येथील कर्मचारी विशिष्ट बॅंकेकडूनच फास्टॅग कार्ड बनविण्यासाठी जाेर देत हाेते. गुप्ता यांनी सांगितले की त्यांनी नावाजलेल्या बॅंकेतून फास्टॅग कार्ड बनविले आहे आणि ती बॅंक एनएचएआयद्वारा मान्यताप्राप्त आहे. याच अकाऊंटवर त्यांच्या १२ वाहनांचे फास्टॅग जुळलेले आहेत. देशभरात चालताना कुठल्याच टाेल नाक्यावर अडचण आली नाही पण या नाक्यावर अडचण कशी, हा सवाल त्यांनी केला. फास्टॅगमध्ये बॅलेन्सचीही समस्या हाेण्याची शक्यता नाही कारण खात्यावर बॅलेन्स १००० रुपयावर आल्यानंतर बॅंकेद्वारे १५००० रुपयाचा ऑटाेरिचार्ज केला जाताे. त्यांनी सांगितले, ज्यावेळी गाडी हळदगाव टाेल नाक्यावर उभी हाेती, त्यावेळी फास्टॅगमध्ये १० हजार रुपये बॅलेन्स हाेते.

असे असताना टाेल नाक्यावरील चुकीसाठी २५० रुपयांऐवजी ५२० रुपये मागण्यात येत हाेते. टाेल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाशी हाेणाऱ्या व्यवहाराबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी बाेलणी केल्यानंतर प्रकरण मिटवण्यात आले. दरम्यान गुप्ता यांनी या प्रकरणात नॅशनल हायवे ऑथारिटी ऑफ इंडिया (एनएचएआई) च्या १०३३ या तक्रार क्रमांकावर संपर्क केला पण यावरून व्यवहारिक रुपात मदत मिळू शकली नाही.

‘आमचे सर्व एक्झिक्यूटिव्ह व्यस्त आहेत’

टाेल नाक्यावर काही समस्या आल्यास मदत किंवा तक्रारीसाठी १०३३ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. मात्र फास्टॅग बंधनकारक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी या क्रमांकावर संपर्क साधला असता बराच वेळ, ‘आमचे सर्व एक्झिक्यूटिव्ह दुसऱ्या काॅलवर व्यस्त आहेत, ते लवकरच आपल्याशी संपर्क करतील’, हेच ऐकायला येत हाेते. हे त्वरित संपर्क हाेण्याचे आश्वासन अर्धा तासापेक्षा अधिकचा काळ सहन करावे लागते. एवढ्या वेळात जवळपास ३० किमीचे अंतर कापले जाऊ शकते. अनेक चालकांकडे स्मार्टफाेन नसतात किंवा बरेच इतके दक्षही नसतात. उन्हाळ्याच्या दिवसात टाेल नाक्यावर अशी अडचण आल्यास दुप्पट तणावाची स्थिती निर्माण हाेऊ शकते.

"५० मध्ये फास्टॅग, "१५० चे बॅलेन्स आवश्यक

फास्टॅग बनविणे खूप कठीण काम नाही. काेणत्याही टाेल नाक्यावर थांबून संबंधित बॅंकेद्वारे फास्टॅग प्राप्त केला जाऊ शकताे. यासाठी कार किंवा जीप असल्यास २०० रुपये अदा करावे लागतात. यामध्ये ५० रुपये फास्टॅग बनविण्याचे शुल्क व १५० रुपये जमा ठेवले जाते.

टाेल वसुली करणाऱ्यावर ५० पट दंड

एखाद्या वाहनात फास्टॅग लागला नसेल तर चालकाला दुप्पट टाेल भरावा लागेल. मात्र फास्टॅग असल्यास आणि त्यात बॅलेन्स असूनही फास्टॅग स्कॅन झाला नाही तर नाक्यावर दुप्पट शुल्क वसूल केले जाऊ शकत नाही. जर एखाद्या टाेल नाक्यावर दुप्पट टाेल वसूल करताना आढळून आल्यास नाका संचालकाकडून ५० पट दंड वसुलीचे प्रावधान आहे. हळदगाव टाेल नाक्याबाबत तक्रार झाल्यास गंभीर चाैकशी केली जाईल.

- राजीव अग्रवाल, क्षेत्रीय अधिकारी, एनएचएआई

Web Title: Difficulty getting fastag scans on tail noses ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.