दिगंबर जैन मंदिराचा वेदी शिलान्यास १५ जून रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:07 PM2019-06-04T23:07:24+5:302019-06-04T23:08:12+5:30
सिद्धेश्वर कॉलनी अंबानगर येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन चैत्यालय सेवा मंडळाद्वारे मंदिर वेदी शिलान्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून रोजी आचार्यश्री सुवीरसागरजी गुरुदेवांच्या ससंघ सानिध्यात हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष किशोर मेंढे, सचिव पद्माकर बुलबुले यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिद्धेश्वर कॉलनी अंबानगर येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन चैत्यालय सेवा मंडळाद्वारे मंदिर वेदी शिलान्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून रोजी आचार्यश्री सुवीरसागरजी गुरुदेवांच्या ससंघ सानिध्यात हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष किशोर मेंढे, सचिव पद्माकर बुलबुले यांनी दिली आहे.
आचार्य पदारोहणानंतर सुवीरसागरजी गुरुदेव ससंघ प्रथमच नागपूरला येत आहे. आचार्यश्री संघाचे १२ जूनला नागपूरला आगमन होईल. शनिवार १५ जून रोजी सकाळी ६ वाजता देव आज्ञा, गुरु आज्ञा होईल व उद्योगपती अरुण इंद्रकुमार श्रावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी ६.३० वाजता अभिषेक व पूजन, ७ वाजता श्री आदिनाथ विधान, सकाळी १० वाजता आहारचर्या, दुपारी १ वाजता पुलक मंच परिवार महावीर वॉर्ड नागपूरचे संरक्षक जगदीश गिल्लरकर यांचे हस्ते वेदी शिलान्यास होईल. सायंकाळी ७ वाजता आरती, ७.३० ला आनंदयात्रा होईल. रविवार १६ जून रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक पूजन, सकाळी ८ वाजता धर्मसभा, १० वाजता आहारचर्या, सायंकाळी ७ वाजता आरती होईल. महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य पं. संजय सरस चिचोली हे आहेत. कार्यक्रमात प्रमुख अतिथी रामटेकचे म्हणून खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे हे उपस्थित राहतील.सोबतच नगरसेवक किशोर कुमेरिया, मंगला गवरे, पुलक मंच परिवार महावीर वॉर्ड नागपूरचे संरक्षक मनीष मेहता, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे माजी राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन पेंढारी, सतीश जैन पेंढारी, श्रवणभाई दोशी, नितीन नखाते, दिलीप शांतीलाल जैन, अभयकुमार पनवेलकर, सरला गडेकर, आनंदराव सवाने, राजकुमार जैन, डॉ. रिचा जैन, सुमत जैन, विवेक सोईतकर, दिलीप शिवणकर, दिलीप गांधी, चंद्रकांत वेखंडे, महेश नायक, प्रकाश मारवडकर, नितीन महाजन, मंगेश बिबे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश येळवटकर, वीरेंद्र गंगणे, धनंजय महात्मे, मनोज गिल्लरकर, राजकुमार भुसारी, सौरभ उदापूरकर, विजय मखे, दिलीप मूठमारे, राजेंद्र पिंजरकर हे कार्यरत आहेत.